Saturday, 28 Sep, 10.22 am प्रभात

मुखपृष्ठ
पाकिस्तानकडून आंतरराष्ट्रीय व्यासपीठाचा दुरूपयोग

संयुक्‍त राष्ट्रसभेत भारताचे पाकला सडेतोड उत्तर

नवी दिल्ली : जम्मू-काश्‍मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम भारताने रद्द केल्यानंतर पाकिस्तानने आपल्या कुरापती दोन्ही देशांच्या सीमारेषेपासून ते आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत सुरू केल्या आहेत. दरम्यान, संयुक्‍त राष्ट्रात भारताविषयी पाकिस्तानने अनेकवेळा खोट्या बातम्या दिल्या आहेत. त्याचीच पुनरावृत्ती शुक्रवारी झाली. पाकिस्तानने जम्मू-काश्‍मीरविषयी भारताची प्रतिमा मलिन करण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न केला परंतू, इथेसुद्धा पाकला भारताकडून सडेतोड उत्तर देण्यात आले आहे.

संयुक्‍त राष्ट्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भाषण केले. आपल्या भाषणात खान यांनी भारताची खोटी आणि बनावट प्रतिमा चित्रित करण्याचा प्रयत्न केला. जेणेकरून आंतरराष्ट्रीय समुदायाची दिशाभूल होईल असा आरोप करत परराष्ट्र मंत्रालयाच्या पहिल्या सचिव विदिशा मैत्रा यांनी आज पाकला सडेतोड उत्तर दिले. राईट टू रिप्लाय अंतर्गत मैत्रा यांनी पाकिस्तानचे प्रत्येक खोटे वक्‍तव्य पाडले. यावेळी मैत्र यांनी, इम्रान खान यांचे भाषण द्वेषाने भरलेले होते आणि त्यांनी जे काही सांगितले ते खोटे होते असे सांगितले.

तसेच पाकिस्तानकडून आंतरराष्ट्रीय व्यासपीठाचा दुरुपयोग करुन समुदायाचा दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे मैत्रा यांनी सांगितले. ओसामा बिन लादेन या जागतिक दहशतवाद्यांचे पाकिस्तानने उघडपणे समर्थन केले असल्याचा आरोपही यावेळी मैत्रा यांनी केला. तसेच 'मानवाधिकारांविषयी बोलणाऱ्या पाकिस्तानने प्रथम पाकिस्तानमधील अल्पसंख्यांकांच्या स्थितीकडे लक्ष दिले पाहिजे ज्यांची संख्या 23 टक्‍क्‍यांवरून 3 टक्‍क्‍यांवर गेली असल्याचेही मैत्रा यांनी नमुद केले. तसेच पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्याविषयी बोलताना, एकेकाळी जंटलमॅनचा खेळ खेळणारे इम्रान खान आता बंदूकांची भाषा करत असल्याची टीकादेखील मैत्रा यांनी केली.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat
Top
// // // // $find_pos = strpos(SERVER_PROTOCOL, "https"); $comUrlSeg = ($find_pos !== false ? "s" : ""); ?>