Tuesday, 17 Sep, 8.51 am प्रभात

मुख्य पान
पंतप्रधानांच्या वाढदिवसाचे अनोख्या पद्धतीने सेलिब्रेशन

सुरतच्या ब्रेडलाईनर बेकरीकडून 700 फूटांचा आणि 7 हजार किलोंचा केक

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस गुजरातमधील सुरत या ठिकाणी असलेल्या एका बेकरीने वेगळ्या पद्धतीने साजरा करण्याचे ठरवले आहे. त्यासाठी बेकरीने तबबत 700 फूट लांबीचा आणि 7 हजार किलोंचा केक तयार करण्यास सुरुवात केली आहे. 17 सप्टेंबर रोजी म्हणजेच आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस थाटामाटात साजरा करण्याचे सुरत येथील ब्रेडलाईनर बेकरीने ठरवले आहे. त्याचमुळे 7 हजार किलो वजनाचा आणि 700 फूट लांबीचा केक तयार करण्याची तयारी सुरु केली आहे.

सुरतमधील 700 प्रामाणिक लोकांकडून हा केक कापण्यात येईल असेही ब्रेडलाईनर बेकरीच्या मालकांनी सांगितले आहे. भ्रष्टाचारमुक्त भारत ही या केकची थीम आहे असेही त्यांनी स्पष्ट केले. तर सुरतमधल्याच अतुल बेकरीने 370 शाळांमध्ये अन्नाची 12 हजार पाकिटांचे वाटप करण्याचे ठरवले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काश्‍मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे अनुच्छेद 370 हटवले त्यामुळेच 370 शाळांमधील विद्यार्थ्यांना अन्नाची पाकिटे दिली जाणार आहे. आपल्या देशाला कुपोषणाची समस्या भेडसावते त्या समस्येतून बाहेर पडण्याची एक सुरुवात म्हणून आणि या समस्येला तोंड देण्यासाठी ही पोषण आहाराची पाकिटे वाटण्यात येणार आहेत असे अतुल बेकरीच्या मालकांनी सांगितले.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat
Top