Tuesday, 23 Feb, 7.29 pm प्रभात

मुखपृष्ठ
"परदेशातून मिळणारा निधी संपला." - शेतकरी नेत्याचे वक्तव्य

नवी दिल्ली - केंद्राच्या नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात गेल्या अडीच महिन्यांपासून आंदोलन सुरू आहे. भारतातच नव्हे, तर जगभरात या आंदोलनाची दखल घेतली गेली. दिल्लीच्या सीमेवर जमा झालेल्या या आंदोलनाच्या नेत्यांमध्ये आता परस्परांवरच चिखलफेक सुरू झाल्याच्या बातम्या आहेत.

आमच्याकडचा परदेशातून मिळालेला निधी आता संपला असल्याचे भारतीय किसान युनियनचे नेते (लोकशक्ती) मास्टर श्‍योराज सिंह यांनी म्हटले आहे.

आपल्याकडचा निधी संपला आहे. आनंद साजरा करा, मीठाई वाटा, टॅक्‍टर रॅलीसाठी लाखो रूपये खर्च करण्यात आले असेही त्यांनी म्हटले असल्याचे वृत्त आहे. छोट्या पडद्यावरील एका कार्यक्रमात बोलताना श्‍योराज सिंह म्हणाले की पृथ्वीराज चौहान राजपूत होते आणि जयचंदही राजपूत होता असे आपण एका गावातल्या कार्यक्रमात म्हटले होते.

मात्र श्‍योराज सिंह जयचंदाची भूमिका करत असल्याचा आणि शेतकऱ्यांसोबत गद्दारी करत असल्याचा आरोप त्यांच्या या वक्तव्यानंतर करण्यात आला आहे. तर राकेश टिकैत यांच्याकडे इतके पैसे कुठून आले असा सवाल ग्रेटर नोएडातील एका शेतकऱ्याने उपस्थित केला आहे. तर अन्य एका नेत्याने त्याच्याकडे 20 एकर शेत असल्याचे आणि कोट्यवधी रूपयांची जमीन असल्याचे म्हटले आहे. आपल्या संपत्तीची चौकशी करा मात्र राकेश टिकैत यांच्याही संपत्तीची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

दरम्यान, राकेश टिकैत यांच्या विरोधातही नाराजीचा सूर उमटू लागल्याच्या बातम्या आहेत. वडील म्हणायचे भरपूर धान्य पिकवा आणि संपूर्ण जगाची भूक भागवा. मात्र मुलगा म्हणतोय शेतातले उभे पिक नष्ट करा, जाळून टाका अशा शब्दांत त्यांना लक्ष्य करण्यात आले आहे. देशात जर अन्नधान्याचे संकट निर्माण झाले तर त्यासाठी राकेश टिकैतच जबाबदार असतील असा आरोपही यावेळी करण्यात आला.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat
Top