Sunday, 13 Oct, 6.06 am प्रभात

मुखपृष्ठ
पारामिलिटरी बटालियनच्या तुकडीचे पथसंचलन

देऊळगांवराजे- आगामी काळात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत कोणत्याही प्रकारचा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून यासाठी मोठ्या प्रमाणात परराज्यातून पॅरामिलटरी बटालियनच्या तुकड्या आलेल्या आहेत. दौंड विधानसभेसाठी देखील एक तुकडी आली असून, या सशस्त्र कंपनीसमवेत शनिवारी दौंड पोलिसांनी दौंड तालुक्‍यातील कुरकुंभ, रावणगांव, खडकी, स्वामी चिंचोली, खानोटा, मळद, राजेगाव, मलठण, बोरिबेल, देऊळगांव राजे या ठिकाणी संचलन केले.

हे पथसंचलन प्रत्येक गावातील मुख्य बाजारपेठेतून करण्यात आले. या संचलनात दौंड पोलीस स्टेशनचे 25 आणि पॅरामिलटरीचे 25 असे एकूण 50 जवान सहभागी झाले होते. दौंड तालुक्‍यात निर्माण होणाऱ्या कोणत्याही समस्यांबाबत सक्षमपणे तोंड देण्यासाठी पोलीस दल तयार आहे, असे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी या वेळी सांगितले.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat
Top
// // // // $find_pos = strpos(SERVER_PROTOCOL, "https"); $comUrlSeg = ($find_pos !== false ? "s" : ""); ?>