अभिनेत्री परिणीत चोप्राचा आगामी 'द गर्ल ऑन द ट्रेन' या थ्रिलर चित्रपटाचा टीझर नुकताच रिलीज करण्यात आला आहे. डायरेक्टर रिभू दासगुप्ताच्या या चित्रपटाची काही दिवसांपासून सोशल मीडियावर खूपच चर्चा सुरू आहे. या टीझरमध्ये परिणीती चोप्राचा हटके अंदाज दिसून येत आहे. यातील तिच्या भूमिकेबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे.
या चित्रपटात परिणीती चोप्रा ही अशा एका मुलीची भूमिका साकारत आहे, जी दररोज रेल्वेने प्रवास करत असते आणि एक दिवस ती एका विचित्र परिस्थितीत सापडते. हा चित्रपट याच नावाने पॉला हॉकिंस यांनी लिहिलेल्या इंग्रजी कादंबरीवर आधारित आहे. इंग्रजी चित्रपटात परिणीति चोप्राची भूमिका अभिनेत्री इमिली ब्लंट हिने साकारली होती.
डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

