Wednesday, 23 Sep, 11.29 am प्रभात

मुखपृष्ठ
पायल घोषकडून अनुराग कश्यपविरोधात एफआयआर दाखल

मुंबई - दिग्दर्शक आणि निर्माता अनुराग कश्‍यप याच्यावर करण्यात आलेल्या वादाच्या प्रकरणात आता नवं वळण आले आहे. पायल अनुराग कश्‍यपवर आरोप केले आहेत. तसेच गेले तीन ते चार दिवस ही अभिनेत्री आणि अनुराग कश्यप यांच्यात ट्विटर वॉर सुरू होते. आता मात्र अनुराग कश्यप हा वर्सोवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत रहात असल्याने अखेर हा गुन्हा वर्सोवा पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आला.

मिळालेल्या माहितीनुसार, काल संध्याकाळी साडे सात वाजतच्या दरम्यान अभिनेत्री वर्सोवा पोलीस ठाण्यात पोहचली होती. त्यानंतर तब्बल चार तास तिने तिथे थांबून आपली तक्रार नोंदवली.

काय आहे संपूर्ण प्रकरण

2015 साली अनुरागने आपल्यावर त्याच्या घरी अतिप्रसंग करून, डांबून ठेवल्याचा आरोप या अभिनेत्रीने केला आहे. या अनुषंगाने अभिनेत्रीने तिच्या वकीलांसह गुन्हा नोंदवण्यासाठी प्रथम ओशिवरा पोलीस ठाणे गाठले होते.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat
Top