Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
PCPC Police : पिंपरी-चिंचवड पोलीस दलात मोठे फेरबदल! १० पोलीस निरीक्षकांच्या तडकाफडकी बदल्या

PCPC Police : पिंपरी-चिंचवड पोलीस दलात मोठे फेरबदल! १० पोलीस निरीक्षकांच्या तडकाफडकी बदल्या

प्रभात 3 months ago

PCPC Police - पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात प्रशासकीय फेरबदल करण्यात आले आहेत. शुक्रवारी (दि. ३० जानेवारी) रोजी झालेल्या बैठकीत मंजुरी देण्यात आल्यानंतर १० पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले आहेत.या आदेशानुसार, दापोडी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले महादेव पांडुरंग कोळी यांची नियंत्रण कक्षात नियुक्ती करण्यात आली आहे.

चिंचवड पोलीस ठाण्यातील अंकुश पांडुरंग बांगर यांना गुन्हे शाखेत पाठविण्यात आले आहे. वाहतूक शाखेतील विजय जानकीराम वाघमारे यांची बदली दापोडी पोलीस ठाण्यात, तर दत्तात्रय दगडू चासकर यांची चिंचवड पोलीस ठाण्यात नियुक्ती करण्यात आली आहे.

नियंत्रण कक्षातील संजय विठ्ठल नरावाड व महेंद्र पंढरी कदम यांना विशेष शाखेत वर्ग करण्यात आले आहे.संत तुकाराम नगर पोलीस ठाण्यातील वनिता धुमाळ यांची बदली आर्थिक गुन्हे शाखेत, तर गुन्हे शाखेतील सुहास सुरेश आव्हाड यांना संत तुकाराम नगर पोलीस ठाण्यात पाठविण्यात आले आहे.

निगडी पोलीस ठाण्यातील संजय ज्ञानोबा चव्‍हाण यांना गुन्हे शाखेत, तर विशेष शाखेतील संदीप शिवाजी सावंत यांना गुन्हे शाखेत नेमणूक देण्यात आली आहे.या बदल्यांमुळे आयुक्तालयातील प्रशासकीय कामकाज अधिक गतिमान होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat