Saturday, 25 Sep, 5.05 pm प्रभात

मुखपृष्ठ
पेट्रोल पंपावरील पंतप्रधान मोदींच्या फोटोवरून, अजित पवारांची खास टिप्पणी; म्हणाले.

पुणे - देशातील इंधन दरवाढीने सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहेत. पेट्रोलने कधीच शंभरी ओलांडली आहे. यावरून केंद्रातील मोदी सरकारवर सातत्याने टीका होतेय. त्यातच प्रत्येक पेट्रोलपंपावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो लावण्याचे अनिवार्य करण्यात आलं आहे. यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या खास शैलीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे.

पेट्रोलचे दर १०० रुपयांच्या पुढे गेले आहेत. प्रत्येक पेट्रोल पंपावर नरेंद्र मोदी यांचा फोटो लावण्यात आला आहे. त्या फोटोवरून अजित पवारांनी उपहासात्मक टीका केली. त्यांच्या टीकेने उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला होता.

अजित पवार म्हणाले की, जवाहरलाल नेहरू, लाल बहादुर शास्त्री, इंदिरा गांधी, अटल बिहारी वाजपेयी मोरारजी देसाई, राजीव गांधी असे अनेक पंतप्रधान आपण पाहिले. या सर्वांनी उत्तम काम केलं. आता मोदी साहेब आहेत. मात्र मोदींनी सध्या कोणाचाही पेट्रोलपंप असो, तिथं आपला स्वत:चा फोटा लावण्याचं बंधनकारक केलय.

आम्ही अनेकदा गंमतीने म्हणतो, पेट्रोल १०० च्या पुढं गेल की, पेट्रोल भरताना फोटोकडे पाहायचं. फोटोतून ते म्हणतात, कशी तुझी जिरवली, भर आता १०० चं पेट्रोल, हे बोलताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. मी कित्येक काम करतो. मी कधीही कुठं बोर्ड लावत नाही. तुम्ही निवडून दिलं. तुमच काम झालंच पाहिजे. आता लसीकरणाच्या प्रमाणपत्रावर देखील फोटो लावलाय. आता लोक म्हणतात, आम्ही वर गेल्यावर एक प्रमाणपत्र मिळत, त्याच्यावरही फोटो लावा.

दरम्यान मोदी यांच्या बळावर भाजप आता ग्रामीण भागात पोहोचली. अनेकांना संधी मिळाल्याचही अजित पवार यांनी नमूद केलं.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat
Top