Friday, 24 Sep, 12.08 pm प्रभात

ताज्या बातम्या
पिंपरी चिंचवड: भाजपाला आणखी एक धक्का; वृक्ष प्राधिकरणचे संभाजी बारणे राष्ट्रवादीत

पिंपरी - पिंपरी-चिंचवड महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला आणखी एक धक्का बसला आहे. वृक्ष प्राधिकरण समितीचे सभासद संभाजी बारणे यांच्या हातावर आज राष्ट्रवादी काँग्रेसने घड्याळ बांधत पक्षामध्ये घेतले.

राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत शुक्रवारी संभाजी बारणे यांनी अधिकृतपणे राष्ट्रवादीत प्रवेश केला. यावेळी पुण्याचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, उद्योजक अभय मांढरे, माजी विरोधी पक्षनेते संतोष बारणे, नगरसेवक विनोद नढे आदी उपस्थित होते.

थेरगाव परिसरातून संभाजी बारणे यांनी २०१७ मध्ये निवडणूक लढवली आहे. अवघ्या ४०० मतांच्या फरकाने बारणे यांना निवडणुकीत पराभव पत्कारावा लागला होता. पिंपरी-चिंचवड महापालिका मराठी भाषा संवर्धन समितीच्या सदस्यपदी बारणे यांनी काम केले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat
Top