Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
PMC News : मुदत संपली तरी नालेसफाई अर्धवट! पाऊस लांबला तरच पालिका वाचणार, अन्यथा पुणे तुंबणार?

PMC News : मुदत संपली तरी नालेसफाई अर्धवट! पाऊस लांबला तरच पालिका वाचणार, अन्यथा पुणे तुंबणार?

प्रभात 2 weeks ago

PMC News - पावसाळापूर्व शहरातील नाले, पावसाळी गटारे आणि कल्व्हर्ट्सची सफाई कामे पूर्ण करण्याची मुदत रविवारी संपली तरी अद्याप २५ टक्के कामे बाकी आहेत. गेले दोन महिने हे काम सुरू असूनही दरवर्षीप्रमाणे नाले सफाईचे काम यावर्षीही पूर्ण झालेले नाही.

बाकीचे काम पूर्ण करण्यास आता पालिकेला मान्सूनने मदत करण्याची गरज आहे. मान्सून चार दिवस लांबणार असल्याचे हवामान विभागाचे संकेत असल्याने ते प्रत्यक्षात उतरले तर पालिकेला सफाईचे काम मुदतीत पूर्ण करता येईल.

महापालिकेने दिलेल्या आकडेवारीनुसार, शहरातील नालेसफाईचे काम ७५, पावसाळी गटार सफाईचे ५९ आणि चेंबर सफाईचे काम ६३ टक्के पूर्ण झाले आहे. दरवर्षी पहिल्याच पावसात शहरातील रस्ते जलमय होणे, वाहतूक कोंडी, सखल भागांत पाणी साचणे आणि नागरिकांची धावपळ ही स्थिती निर्माण होते. यंदाही जूनच्या सुरुवातीलाच जोरदार पाऊस झाल्यास शहरात गंभीर स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. विशेषतः मध्यवर्ती, आणि सखल भागांमध्ये अद्याप सफाईची कामे रखडलेली असल्याने नागरिकांच्या मनात भीती आहे.

नाले सफाईची स्थिती
पालिकेच्या आकडेवारीनुसार, १५ क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत एकूण १२९ नाले आहेत. त्यांची एकत्रित लांबी २ लाख ३४ हजार ५१२ मीटर इतकी आहे. यापैकी २ लाख २१ हजार ५०० मीटर नाल्यांची सफाई करण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. मात्र, आतापर्यंत अवघ्या ५५ हजार ३९१ मीटर नाल्यांचीच सफाई पूर्ण झाली आहे. तब्बल १ लाख ६७ हजार ०५९ मीटर नाले साफ होणे बाकी आहे. सध्या दररोज सुमारे ३ हजार ५१२ मीटर नाले साफ केले जात आहेत. या वेगाने उर्वरित कामे पूर्ण होण्यासाठी कितीतरी दिवस लागण्याची शक्यता आहे.

कल्व्हर्ट्स सफाईची स्थिती
शहरातील कल्व्हर्ट्स, क्रिटिकल स्पॉट्सची स्थितीही असमाधानकारक आहे. शहरात एकूण ४५७ कल्व्हर्ट्स असून त्यापैकी १५८ ठिकाणे अतिसंवेदनशील आहेत. आतापर्यंत १३८ क्रिटिकल स्पॉट्सची सफाई पूर्ण झाली असून २१ ठिकाणी काम बाकी आहे. पालिकेकडून दररोज सरासरी २४ कल्व्हर्ट्स साफ केले जात असल्याचा दावा होत असला तरी काही भागांत कामाचा वेग अत्यंत मंद आहे.

गटारे, चेंबर्सची स्थिती
शहरात एकूण २ लाख ४० हजार ११६ मीटर स्टॉर्म वॉटर लाइन साफ करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यापैकी केवळ १ लाख ५१ हजार ५२५ मीटर लाईन साफ झाली आहे. म्हणजेच ३७ टक्क्यांहून अधिक काम बाकी आहे. त्याचप्रमाणे, ४२ हजार ३९४ चेंबर्सपैकी १८ हजार ३०१ चेंबर्सची सफाई झाली आहे. याचे अद्याप ३० टक्के काम शिल्लक आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat