Policeman injured in CJP march: सीजेपीच्या आंदोलनादरम्यान दिल्ली पोलीस आणि आंदोलकांमध्ये संघर्ष झाला. पोलिसांनी लाठीचार्ज आणि अश्रुधुराच्या नळकांड्यांचा वापर केला. या संघर्षात दिल्ली पोलिसांचे अनेक कर्मचारी आणि अधिकारी जखमीही झाले.
शुक्रवारी जखमी पोलीस अधिकाऱ्यांच्या कुटुंबीयांनी या संदर्भात पत्रकार परिषद घेतली.
जखमी दिल्ली पोलीस अधिकाऱ्यांच्या कुटुंबीयांनी झालेल्या आंदोलनाविषयी प्रतिक्रिया देत त्यांच्या घरच्यांवर झालेल्या हल्ल्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली. याविषयी बोलताना, “आम्हाला आमची बाजू माध्यमांसमोर मांडायची आहे. आम्ही आंदोलनात जखमी झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांशी बोलून व्हिडिओ बनवले आहेत आणि ते दाखवले आहेत.” असे त्यांनी म्हटले.
तसेच त्यांनी एक निवेदन सादर केले आहे. ज्यामध्ये, खाकी वर्दीमागे केवळ एक पोलीस नसतो; त्यांच्यामागे त्यांच्या आई, पत्नी आणि मुले असतात, जी रात्री त्यांच्या घरी सुखरूप परतण्याची वाट पाहतात.” असे म्हटले आहे.
सीजेपी आणि विद्यार्थी आंदोलनादरम्यान दिल्लीत जखमी झालेल्या एका एएसआयची पत्नी सीमा यांनी सांगितले की, “आंदोलनाच्या ठिकाणी दंगलखोर उपस्थित होते. “पोलिसांनाही कुटुंबे असतात. ” असेही त्यांनी म्हटले. जखमी एएसआयच्या मुलीने सांगितले, “माझ्या वडिलांना गुन्हेगार म्हटले गेले.” त्यांच्या पत्नीने सांगितले की, पोलिसांवर दगडफेक करण्यात आली.
“संपूर्ण गणवेश रक्ताने माखला होता.” policeman injured in CJP march:
कुटुंबातील सदस्यांनी सांगितले की, गणवेशामागे केवळ एक माणूस नसतो, तर एक मुलगा आणि पतीसुद्धा असतो. जखमी पोलिसाची मुलगी कुंदन म्हणाली, “माझे वडीलही जखमी झाले होते.” तिने सांगितले की, २५ तारखेला जंतर मंतर येथे तिचे वडील जखमी झाले. त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना आणले, तेव्हा त्यांचा संपूर्ण गणवेश रक्ताने माखलेला होता. त्यांच्या डोक्याला चार टाके पडले होते.”माझे वडील कर्तव्य बजावत होते…आणि त्यांना बदल्यात काय मिळाले ?” असे म्हणत आम्हाला न्याय कोण देणार अशी भावनिक साद देखील घातली.
जखमी एएसआयच्या पत्नीने काय सांगितले? policeman injured in CJP march:
जखमी एएसआयची पत्नी सीमा म्हणाली, “जंतर मंतर येथील आंदोलनादरम्यान माझे पतीसुद्धा कर्तव्यावर होते. २० जुलै रोजी जेव्हा मी त्यांच्याशी बोलले, तेव्हा ते म्हणाले की तिथे प्रचंड गर्दी होती. जेव्हा मी त्यांना संध्याकाळी ७ वाजता फोन केला, तेव्हा त्यांच्यावर एलएनजेपीमध्ये उपचार सुरू होते.” तिने सांगितले की जमाव हिंसक झाला आणि त्यात अनेक पोलीस जखमी झाले. तिने पुढे सांगितले की तिच्या पतीला संरक्षणासाठी दिलेले हेल्मेटही तुटले होते.

