Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Pradeep Rawat : बॉलिवूडचा 'गजनी' हरपला; अभिनेते प्रदीप रावत यांचे निधन

Pradeep Rawat : बॉलिवूडचा 'गजनी' हरपला; अभिनेते प्रदीप रावत यांचे निधन

Pradeep Rawat : हिंदी चित्रपटसृष्टीतील दमदार खलनायक म्हणून ओळखले जाणारे आणि 'लगान', 'गजनी'सह अनेक गाजलेल्या चित्रपटांमधील प्रभावी भूमिकांमुळे प्रेक्षकांच्या मनात घर करणारे ज्येष्ठ अभिनेते प्रदीप रावत यांचे निधन झाले आहे.

(Pradeep Rawat)

वयाच्या ७४व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाची माहिती अभिनेते यशपाल शर्मा यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली. त्यांच्या पश्चात पत्नी आणि मुलगा विक्रमादित्य असा परिवार आहे. (Pradeep Rawat)

रक्ताच्या कर्करोगाशी सुरू होती झुंज

प्रदीप रावत गेल्या काही काळापासून रक्ताच्या कर्करोगाशी झुंज देत होते. त्यांच्या मॅनेजरने दिलेल्या माहितीनुसार, आजार पुन्हा बळावल्याने गेल्या महिनाभरापासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. सुरुवातीला त्यांना कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर पुढील उपचारांसाठी दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, डॉक्टरांच्या सर्व प्रयत्नांनंतरही उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. (Pradeep Rawat)

प्रदीप रावत यांनी आपल्या कारकिर्दीत ‘लगान’, ‘गजनी’ यांसारख्या सुपरहिट चित्रपटांमधून संस्मरणीय भूमिका साकारल्या. विशेषतः खलनायकाच्या भूमिका त्यांनी अत्यंत प्रभावीपणे साकारत हिंदी चित्रपटसृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली असून चाहत्यांसह अनेक कलाकारांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. (Pradeep Rawat)

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat