Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
प्रेक्षक पुन्हा मैदानांत ; आयपीएल सामन्यांसाठी मर्यादित प्रेक्षकांना प्रवेश

प्रेक्षक पुन्हा मैदानांत ; आयपीएल सामन्यांसाठी मर्यादित प्रेक्षकांना प्रवेश

प्रभात 5 years ago

नवी दिल्ली - येत्या रविवारी आयपीएलच्या दुसऱ्या टप्याला सुरुवात होणार आहे, स्पर्धेचे सामने अमिराती होणार असून , या सामन्यासाठी मर्यादित प्रेक्षकांना प्रवेश मिळणार आहे.


कोविडविषयी सर्व लेटेस्ट अपडेट येथे वाचा

याआधी कोरोना वाढल्याने मे महिन्यात स्पर्धा थांबविण्यात आली होती. नंतर दुसरा टप्पा अमिराती येथे घेण्याचे निश्चित झाले होते.

त्यानुसार हा टप्पा रविवारपासून सुरू होत आहे. मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज हा दुसऱ्या टप्प्यातील पहिला सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानावर होईल.या सामन्याने दुबईत क्रिकेटच्या सामन्यांसाठी प्रेक्षक प्रेक्षक पुन्हा मैदानात उपस्थिती लावणार आहेत. अर्थात, कोविड 19 चा धोका लक्षात घेता प्रेक्षकांच्या संख्येवर मर्यादा असेल.

सामने दुबई, शारजा आणि अबु धाबी येथे होणार आहेत. यामुळे 2019 नंतर आयपीएलचे सामने प्रथमच प्रेक्षकांच्या उपस्थितीत होतील. गेल्यावर्षी येथेच झालेली आयपीएल आणि या वर्षीचा भारतातील टप्पा हा प्रेक्षकांशिवायच पार पडला होता.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat