Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Priyanka Chopra : प्रियांका चोप्राने परदेशातही जपली भारतीय संस्कृती, लेकीला शिकवला दुर्गामातेचा मंत्र

Priyanka Chopra : प्रियांका चोप्राने परदेशातही जपली भारतीय संस्कृती, लेकीला शिकवला दुर्गामातेचा मंत्र

Priyanka Chopra : अभिनेत्री प्रियांका चोप्राने बॉलीवूडसह हॉलीवूडमध्येही आपल्या अभिनय कौशल्याने मोठे यश मिळवले आहे. अमेरिकन गायक निक जोनशी विवाह केल्यानंतर प्रियांका अमेरिकेत स्थायिक झाली.

प्रियांकाला एक लहान मुलगी देखील असून तिच्यासोबतचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते.

मात्र निक जोनशी विवाह केला असला तरीही ती भारतीय परंपरा काही विसरलेले नाही. ती नेहमीच आपल्या रुढी-परंपरा जपताना दिसते. प्रियंकाचे भारतावरचे प्रेम आजही तितकेच कायम आहे आणि याची झलक वारंवार पाहायला मिळते. प्रियंका आपली मुलगी मालतीलासुद्धा नेहमी मंदिरात घेऊन जाते आणि तिला लहानपणापासूनच भारतीय संस्कृती आणि परंपरांशी जोडत आहे.

सध्या तिने मुलीसोबतचा एक व्हिडीओ सोशल मिडियावर शेअर केला आहे. ज्याचे अनेकांकडून कौतुक केले जात आहे. व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की, प्रियांका आपल्या मुलीला दुर्गा सप्तशक्तीचे मंत्र शिकवत आहे. प्रियांका चोप्रा मालती मेरीला 'दुर्गा सप्तशती'मधील काही मंत्रही शिकवत असल्याचं दिसून येत आहे.

प्रियांकानंतर मालतीदेखील 'सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके।शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते…' असा श्लोक म्हणत आहे. प्रियांका चोप्राने हा व्हिडिओ तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे, ज्यात तिने आपली दोन रूपे दाखवली आहेत आहे. व्हिडिओच्या पहिल्या भागात प्रियंका आपली मुलगी मालतीला दुर्गा सप्तशतीचे मंत्र शिकवत आहे, तर दुसऱ्या भागात ती एका सुंदर ड्रेसमध्ये नाचत आहे.

प्रियांका चोप्राने 2018 मध्ये राजस्थानमधील जोधपूर येथील उम्मेद भवन पॅलेसमध्ये निक जोनासशी लग्न केले. 2022 मध्ये, प्रियांका सरोगसीद्वारे तिची मुलगी मालती मेरीची आई झाली. तेव्हापासून, प्रियांका आणि निक दोघेही मालतीसोबतच्या त्यांच्या अविस्मरणीय क्षणांचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत आहेत.

प्रियंका चोप्रा हैदराबादमध्ये
प्रियंका चोप्रा ‘वाराणसी’ या चित्रपटाद्वारे तब्बल ८ वर्षांनंतर भारतीय चित्रपटसृष्टीत पुनरागमन करत आहे. हा चित्रपट २०२७ मध्ये प्रदर्शित होणार आहे. एस एस राजमौली यांच्या 'वाराणसी' चित्रपटाचे सध्या शूटिंग सुरू असून या चित्रपटाच्या शूटिंगसाठी ती कुटुंबासह भारतात येत आहे.

Shivsena Hearing : शिवसेना पक्ष आणि चिन्ह वादावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी, 'धनुष्यबाण' कोणाला मिळणार?

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat