Thursday, 08 Apr, 10.33 pm प्रभात

मुख्य बातम्या
Pune Coronavirus | गेल्या 24 तासात जिल्ह्यात 12000हून अधिक पाॅझिटिव्ह; 70 जणांचा मृत्यू

पुणे - जिल्ह्यातील करोनाबाधित संख्या दिवसेंदिवस वाढत असून, गुरुवारी (दि. 8) संख्येने तब्बल 12 हजार 90 चा टप्पा पार केला आहे. तर, गेल्या 24 तासांत करोनामुळे 70 जणांचा मृत्युची नोंद झाली आहे. पुणे शहरात सर्वाधिक बाधित संख्या 7 हजार 10 इतकी आहे. तर, 43 जणांच्या मृत्युची नोंद झाली आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये बाधित संख्या काहीशी कमी झाली असून, गुरुवारी 2 हजार 351 नवीन बाधित सापडले, तर 15 जणांचा मृत्यू झाला. ग्रामीण, नगरपालिका हद्दीत बाधित संख्येने 2 हजार 578 चा आकडा पार पडला केला असून, 10 जणांचा मृत्यू झाला आहे.

कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीत 151 बाधित सापडले असून, दोन जणांचा मृत्युची नोंद झाली आहे. दरम्यान, दिवसभरात 6 हजार 948 बाधित करोनामुक्‍त झाले आहेत. सध्या 21 हजार 426 बाधितांवर रुग्णालयात उपचार सुरू असून, 68 हजार 172 बाधित होम आयसोलेशन आहेत. दिवसभरात तब्बल 46 हजार 308 संशयितांची तपासणी करण्यात आली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat
Top