Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Pune Crime : अनधिकृत पुतळा बसविणाऱ्याकडून पोलीसांना धक्काबुक्की

Pune Crime : अनधिकृत पुतळा बसविणाऱ्याकडून पोलीसांना धक्काबुक्की

प्रभात 5 years ago

पुणे - येरवड्यातील सेवालाल चौकात महापुरूषांचा अनधिकृतरित्या पुतळा बांधकामकरून उभा केल्यानंतर तो काढून टाकण्यास सांगण्यास गेलेल्या महापालिकेच्या कर्मचाऱ्यांसह पोलीसांना धक्काबुक्की करत सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याची घटना घडली आहे.

याप्रकरणी सनी रमेश चव्हाण (26 ), राहुल सुरेश चव्हाण (29 ), आकाश सुरेश चव्हाण (45 ), बबलु दुबील ऑझ (38) व लक्ष्मी सुरेश चव्हाण (45 ) यांना अटक केली आहे. याप्रकरणी पोलीस कर्मचारी अजित मगदुम यांनी येरवडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी परवाणगी न घेता चौकात बांधकामकरून महापुरूषांचा पुतळा उभा केला होता. तो पुतळा काढून घेण्यास त्यांना सांगण्यात आले होते. परंतु, त्यांनी पुतळा काढण्यास नकार देत सार्वजनिक ठिकाणी दंगाकरून गोंधळ घातला. तसेच, पालिका कर्मचारी, पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कायदेशीर कामात अडथळानिर्माण करत त्यांना धक्काबुक्की केली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat