Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Pune : डबल नॅशनल चॅम्पियन जिमनॅस्ट साहिल मरगजेला 'समाजरत्न' पुरस्कार

Pune : डबल नॅशनल चॅम्पियन जिमनॅस्ट साहिल मरगजेला 'समाजरत्न' पुरस्कार

प्रभात 3 weeks ago

Pune : राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल करणारा डबल नॅशनल चॅम्पियन जिमनॅस्ट साहिल पांडुरंग मरगजे याला क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल प्रतिष्ठेचा 'समाजरत्न पुरस्कार (क्रीडा)' जाहीर झाला आहे.

माणूस परिवार महाराष्ट्र राज्य प्रणित आदर्श कार्यकर्ता गौरव समितीतर्फे हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

पुरस्कार वितरण सोहळा मंगळवार, २ जून २०२६ रोजी सायंकाळी ४.३० वाजता आयोजित करण्यात आला असून केंद्रीय राज्यमंत्री तथा खासदार मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते साहिलला हा सन्मान प्रदान करण्यात येणार आहे.

प्रतिकूल परिस्थितीवर मात करत साहिलने जिम्नॅस्टिक्स क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केले आहे. राष्ट्रीय स्पर्धांमधील चमकदार कामगिरीमुळे त्याने महाराष्ट्राच्या क्रीडा क्षेत्राचा गौरव वाढविला आहे. त्याच्या या प्रेरणादायी आणि यशस्वी क्रीडा प्रवासाची दखल घेत 'समाजरत्न' पुरस्कारासाठी त्याची निवड करण्यात आली आहे.

या पुरस्कार सोहळ्यात समाज, शिक्षण, क्रीडा आणि विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अनेक मान्यवरांचाही गौरव करण्यात येणार असून विविध क्षेत्रांतील प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित राहणार आहेत. मरगजेला मिळालेल्या या सन्मानामुळे क्रीडा क्षेत्रातील युवा खेळाडूंना प्रेरणा मिळणार असल्याची भावना व्यक्त होत आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat