Dailyhunt
pune gas leak: पुण्यात मध्यरात्री गॅस गळतीची घटना ! अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे अनर्थ टळला; २४ नागरिकांना श्वसनाचा त्रास

pune gas leak: पुण्यात मध्यरात्री गॅस गळतीची घटना ! अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे अनर्थ टळला; २४ नागरिकांना श्वसनाचा त्रास

प्रभात 2 weeks ago

Pune gas leak: पुण्यातील मार्केट यार्डातील गंगाधाम-बिबवेवाडी रस्त्यावर मध्यरात्री मोठा अनर्थ होता होता टळला आहे. याठिकणी असलेल्या एका रासायनिक कंपनीतून मध्यरात्री गॅस गळती झाली.

अग्निशमन दलाच्या जवानांनी त्वरीत घटनास्थळी धाव घेऊन गॅस गळती रोखल्याने अनर्थ टळला. pune gas leak

रासायनिक कंपनीतून गॅस गळती झाल्यानंतर परिसरातील नागरिकांना श्वसनाचा झाल्याने त्यांना तातडीने ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेत अग्निशमन दलाचे एक अधिकारी आणि जवानाला त्रास झाला. त्यांनाही रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. (Pune gas leak)

गंगाधाम रस्त्यावर आईमाता मंदिरासमोर ही रासायनिक कंपनी आहे. या कंपनीतून मध्यरात्री मोठ्या प्रमाणावर गॅस गळती सुरू झाली. गॅस गळती झाल्यानंतर परिसरातील २४ नागरिकांना त्रास जाणवू लागला. डोळे चुरचुरणे, श्वसनाचा त्रास जाणवल्याच्या तक्रारी करण्यात आला. pune gas leak

गॅस गळतीची घटना समजल्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने मदतकार्य सुरू केले. सुरक्षाविषयक उपकरणे परिधान करुन आधिकारी आणि जवान कंपनीत शिरले. त्यांनी तातडीने गॅस गळती रोखली. ( pune gas leak)

नागरिकांना त्रास जाणवू लागल्याची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाचे अधिकारी आणि जवानांनी तातडीने नागरिकांना ससून रुग्णालयात दाखल रुग्णवाहिकेतून दाखल केले. गॅस गळतीमुळे २४ नागरिकांना त्रास झाला. अग्निशमन दलाचे एक अधिकारी आणि जवान यांनाही त्रास झाला. त्यांना ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. (pune gas leak)

सुदैवाने या घटनेत कोणी गंभीर जखमी झाले नाही', अशी माहिती अग्निशमन दलाचे मुख्य अधिकारी देवेंद्र पोटफोडे यांनी दिली. अग्निशमन अधिकारी देवेंद्र पोटफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पाच अधिकारी आणि ३० जवान मदतकार्यात सहभागी झाले होते. परिणामी आता परिस्थिती नियंत्रणात आहे. मात्र, हि गॅस गळती नेमकी कशी झाली हे अद्याप कळू शकलं नाही. pune gas leak

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat