Tuesday, 22 Sep, 9.35 am प्रभात

मुख्य बातम्या
पुणे जिल्हा: तमाशा कलावंतांचे उपोषण दीड तासांत मागे

नारायणगाव - महाराष्ट्र राज्य तमाशा फडमालक कलावंत विकास महामंडळाच्या वतीने नारायणगावात विविध मागण्यांसाठी सोमवारी (दि. 21) सुरू केलेले उपोषण सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख व आमदार अतुल बेनके यांच्या आश्‍वासनानंतर अवघ्या दीड ते दोन तासांत मागे घेण्यात आले.

अखिल भारतीय मराठी तमाशा महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, शरद सांस्कृतिक कला प्रतिष्ठानचे अध्यक्ष लक्ष्मिकांत खाबिया, डॉ. संतोष खेडलेकर, अमर पुणेकर यांच्यासह राज्यातील अनेक तमाशा फडमालक व कलावंत या उपोषणाला उपस्थित होते.

तळागाळातील सर्व प्रकारचे कलावंत तसेच तमाशा क्षेत्राशी संबंधित असलेले सर्व कर्मचांऱ्यांना करोना लॉकडाऊनच्या कालावधीत दरमहा 5 हजार रुपये मानधन मिळावे, तमाशासाठी वेगळे महामंडळ स्थापन करावे, प्रत्येक फडमालकांना आर्थिक पॅकेज द्यावे, तमाशा उभारणीसाठी बॅंकेतून 25 लाखापर्यंत कर्ज द्यावे, लॉकडाऊन संपल्यानंतर तमाशा व इतर सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी द्यावी, कलावंतांना घरकुल व मुलांना शिक्षण मोफत दिले जावे, आदी मागण्यांसाठी हे उपोषण करण्यात आले. तमाशा फड मालकांच्या व कलावंतांच्या मागण्या शासन दरबारी मांडू, असे आश्‍वासन आमदार बेनके यांनी दिले.

यावेळी सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांनी देखील फोनवरून कलावंतांच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करू, असे आश्‍वासन दिल्यानंतर रघुवीर उपोषण मागे घेण्यात आले.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat
Top