Wednesday, 02 Oct, 9.30 am प्रभात

मुखपृष्ठ
पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे नगरसेवक अतुल गायकवाड यांचे 'ना'राजीनामा नाट्य

पुणे - पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे नगरसेवक अतुल गायकवाड यांना भाजपने कॅन्टोन्मेंटमधून उमेदवारी न दिल्याने त्यांनी नाराजी व्यक्त करत शहराध्यक्ष माधुरी मिसाळ यांच्याकडे राजीनामा दिला. मात्र, सायंकाळपर्यंत त्यांची नाराजी दूर झाल्याने त्यांनी तो परत घेतल्याचे समजते.

गायकवाड हे सन 2015 मध्ये पुणे कॅन्टोन्मेंट बार्डाच्या झालेल्या निवडणुकीत वॉर्ड क्रमांक 4 मधून निवडून आले होते. त्यांनी विधानसभेसाठी जोरदार तयारी केली होती. मागील महिन्यात पक्षाने इच्छुकांच्या घेतलेल्या मुलाखतीसाठी उपस्थिती लावली होती.

मात्र, मंगळवारी पक्षाने जाहीर केलेल्या यादीमध्ये सुनील कांबळे यांचे नाव जाहीर झाल्याने नाराज झालेले गायकवाड यांनी तडकाफडकी पदाचा राजीनामा दिला. याचे पत्र बोर्डाचे अध्यक्ष मेजर जनरल नवनीत कुमार, उपाध्यक्ष विवेक यादव, पक्षाच्या शहराध्यक्ष आमदार माधुरी मिसाळ, खासदार गिरीश बापट यांच्याकडे पाठवला आणि तो नंतर मागे घेतला. दरम्यान, या नाराजी नाट्याची चर्चा दिवसभर शहरात होती. हे वातावरण कसे शांत केले जाते, हे लवकरच स्पष्ट होणार आहे.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat
Top
// // // // $find_pos = strpos(SERVER_PROTOCOL, "https"); $comUrlSeg = ($find_pos !== false ? "s" : ""); ?>