Saturday, 18 Sep, 7.56 pm प्रभात

ताज्या बातम्या
Pune : माजी सभापती मंगलदास बांदल आणखी एका गुन्ह्यात अटक; 23 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी

पुणे - शेतकऱ्याची कोट्यावधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती मंगलदास विठ्ठल बांदल (वय 45, रा. मु.पो. शिक्रापूर, ता. हवेली) याला आणखी एका गुन्ह्यात गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. त्याला न्यायालयाने त्याला 23 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

त्यांच्याविरोधात एका 74 वर्षीय शेतकऱ्याने लोणीकंद पोलिसात फिर्याद दिली आहे. वढू खूर्द भागात 2013 आणि त्यानंतरच्या कालावधीत हा प्रकार घडला. आरोपी मंगलदास बांदलसह इतर आरोपींनी शिवाजीराव भोसले बॅंकेतील अधिकाऱ्याशी संगणमत केले. तसेच फिर्यादींना चारचाकी गाडीत डांबून ठेवत दमदाटी केली आणि रिव्हॉल्वरच्या धाकाने फिर्यादीच्या मालकीची वढू खुर्द भागातील 3 हेक्‍टर 71 आर जमीनीचे गहाणखत केले आणि 6 कोटी 75 लाख रूपये परस्पर बॅंकेतून काढून घेतले.

तसेच जमिनीवरील बोझा कमी करण्यासाठी आरोपींनी फिर्यादींकडे 1 कोटी रूपयांची मागणी केली आहे. तसेच अद्याप बोझा कमी केला नसल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. या प्रकरणी पुणे शहर गुन्हे शाखा युनिट 6 ने मंगलदास बांदल यास शुक्रवारी अटक करून न्यायालयात हजर केले. त्यावेळी पोलीस कोठडी देण्याची मागणी सहायक सरकारी वकील विजयसिंह जाधव यांनी केली.

आरोपींनी फिर्यादीचे बनविलेले गहाणखतासंदर्भात कागदपत्रे हस्तगत करणे, तसेच गहाणखत बनवून बॅंकेकडून घेतलेले 6 कोटी 75 लाख रूपयांची विल्हेवाट कशी लावली याचा आरोपींकडे तपास करायचा आहे. गुन्ह्यात वापरलेले रिव्हॉल्वर जप्त करणे आदी तपास करण्यासाठी त्याला पोलीस कोठडी द्यावी अशी मागणी सहायक सरकरी वकील विजयसिंह जाधव यांनी केली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat
Top