ऑक्टोबर महिन्यात मिळाला दिलासा
पुणे - करोनातून बरे झाल्यानंतर उद्भवणाऱ्या म्युकरमायकोसिस आजार ग्रामीणमध्ये आटोक्यात आला. दिलासादाय म्हणजे ऑक्टोबर महिन्यात आतापर्यंत म्युकरमायकोसिसचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही.
पुणे जिल्ह्यातील ग्रामीणमध्ये आतापर्यंत एकूण 97 म्युकरमायकोसिसचे रुग्ण सापडले आहेत. त्यातील 86 रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत. तर, 2 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत म्युकरमायकोसिस आजाराने 9 जणांचा मृत्यू झाला असून, त्यामध्ये एप्रिल महिन्यात 6 तर जून महिन्यात 3 जणांचा समावेश आहे.
करोनातून बरे झालेल्यांमध्ये म्युकरमायकोसिसचा आजार बळावतो. हा संसर्गजन्य आजार नसला, तरी तो तोंड, डोळे आणि मेंदूवर आघात करणारा आहे. या आजारावर उपचार करताना अनेक इंजेक्शन द्यावी लागत असून, त्यासाठी मोठा खर्च होतो. त्यामुळे या उपचारांना महात्मा फुले जन आरोग्य योजनेत समाविष्ट केले आहे.
डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

