Sunday, 29 Nov, 7.29 pm प्रभात

मुखपृष्ठ
पुणे : नवले ब्रिजजवळ भीषण अपघात; ब्रेक फेल ट्रेलरची 7 ते 8 वाहनांना धडक

पुणे (प्रतिनिधी) - शहरातील अपघातांचा हॉटस्पॉट ठरत असलेल्यानवले पुलाजवळ आज आणखी एक भीषण अपघात झालाय. आज सायंकाळी सव्वासहा वाजता बंगलोरकडून मुंबईकडे जाणाऱ्या एका 22 चाकी ट्रेलरचा ब्रेक फेल होऊन झालेल्या अपघातात अनेक वाहने एकमेकांना धडकली. यामध्ये एक रिक्षाचालक व दुचाकीस्वार जागीच ठार झालेत तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना एका खासगी रूग्णालयात दाखल केले आहे.

दरम्यान, या विचित्र अपघातामध्ये एकाचवेळी सहा गाड्या एकमेकांना धडकल्या असून तीन गाड्यांचा चुराडा झालाय. अपघाताबाबत माहिती देताना देविदास घेवारे (वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सिंहगड पो़.स्टे़) यांनी, 'अपघातात एकाच मृत्यू झाला असून चार जण गंभीर जखमी झाले असल्याचे सांगितले. अनेक दुचाकींचे देखील यामध्ये मोठे नुकसान झाले आहे.

असा झाला अपघात

बंगलोरकडून मुंबईकडे 22 चाकी ट्रेलर आर जे 19 जीएफ 4673 जात असताना त्याचे ब्रेक फेल झाले त्याने एक टेम्पो, दोन दुचाकी, एक रिक्षा, चार कार यांना पावणे सहाच्या सुमारास धडक दिली. यात रिक्षा चालक जागिच ठार झाला, तर चार गंभीर जखमी, पाच किरकोळ जखमी झाले. ट्रेलरमध्ये 41 टन मेटल होते. ट्रेलर चालक प्रेमराम रामाराम बिष्णोई ( रा़-जोधपूर, राजस्थान) याला सिंहगड पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याची माहिती पोलिस उपनिरीक्षक खेडेकर यांनी दिली दिली.

दरम्यान, अपघाताची माहिती मिळाल्यानंतर सिंहगड पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. याशिवाय सिंहगड वाहतूक विभाग आणि अग्निशमन दलाच्या काही काही गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. या अपघातामुळे मुंबई बंगळूर महामार्गावर वाहतुकीची कोंडी झाली होती. पोलिसांनी क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या बाजूला काढले असून वाहतूक कोंडी सोडवण्याचा प्रयत्न सुरू आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat
Top