Dailyhunt
Pune Temperature : पुण्याचा पारा ३६ अंशाच्या पार; उन्हाचा चटका आणखी वाढणार, पाहा तुमच्या भागातील तापमान

Pune Temperature : पुण्याचा पारा ३६ अंशाच्या पार; उन्हाचा चटका आणखी वाढणार, पाहा तुमच्या भागातील तापमान

Pune Temperature - अवकाळी पावसाने विश्रांती घेतली आणि शहरासह जिल्ह्यातील कमाल तापमानात वाढ झाली. रविवारी (दि. ५) लोहगाव येथे सर्वाधिक ३६ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. तर पुढील दोन ते तीन दिवस शहरातील आकाश सामान्यत: निरभ्र तर दुपारनंतर ढगाळ वातावरण राहील.

त्यानंतर कमाल तापमानात वाढ होऊन उन्हाचा चटका वाढण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तवली आहे. अवकाळी पावसामुळे मागील आठ दिवसांपासून शहरासह उपनगरात उन्हाचा चटका कमी झाला असून, गारवा वाढलेला होता.

मात्र,मागील दोन दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्यामुळे ३२ अंशापर्यंत खाली आलेले कमाल तापमान ३६ अंशाच्या पुढे गेले आहे. त्यामुळे दुपारी काहीसा उन्हाचा चटका जाणवत असला तरी ढगाळ वातावरणामुळे उकाडाही जाणवत आहे. लोहगाव येथे ३६.१, शिवाजीनगर येथे ३३.७, चिंचवड आणि एनडीए परिसरात ३२.८ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. दिवसभर उकाडा जाणवत असला तरी रात्री आणि पहाटेच्या गारव्याने नागरिकांना दिलासा मिळत आहे. मात्र, पुढील आठवड्यात कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता असल्याने उन्हाचा चटका पुन्हा वाढणार आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat