Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
पुण्याहून रात्री जुन्नरला येणारी बस आजपासून पुन्हा सुरू

पुण्याहून रात्री जुन्नरला येणारी बस आजपासून पुन्हा सुरू

प्रभात 4 years ago

जुन्नर(प्रतिनिधी) - शिवाजीनगरहून (पुणे) रात्री 10 वाजता जुन्नरला येणारी बससेवा बुधवारपासून (दि. 27) पुन्हा सुरू करण्यात आल्याची माहिती नारायणगाव आगार व्यवस्थापक बालाजी सूर्यवंशी यांनी दिली.

गेल्या चार वर्षांपूर्वी ही बस तोट्यात चालत असल्याचे कारण सांगत महामंडळाने बंद केली होती. त्यानंतर विविध संघटनांनी ही सेवा पुन्हा सुरू व्हावी, यासाठी प्रयत्न केले होते.

व्यापारी, विद्यार्थी, शिक्षक आदींना सोयीची ठरणारी ही बस बंद असल्याचे महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी मंदार पोहरे यांच्या निदर्शनास आल्यावर त्यांनी तात्काळ लक्ष घालून ही सेवा फेब्रुवारी महिन्यात पुन्हा एकदा सुरू केली होती.

मात्र कोविड पार्श्वभूमीवर रात्रीचे प्रवासी कमी मिळत असल्याने ही सेवा तात्पुरती बंद करण्यात आली होती. सदर पुणे-जुन्नर चालणारी बससेवा पुन्हा एकदा सुरू झाल्यामुळे व्यापारी असोसिएशन, विद्यार्थी संघटना व प्रवाश्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat