Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
पुण्यात राष्ट्रीय खेळाडूला भररस्त्यात मारहाण

पुण्यात राष्ट्रीय खेळाडूला भररस्त्यात मारहाण

प्रभात 5 years ago

पुणे - पुण्यात सिग्नलवर गाडी पुढे नेण्याच्या वादावरुन एकाने राष्ट्रीय खेळाडूला भररस्त्यात मारहाण केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. शहरातील फातिमानगर परिसरता हा प्रकार घडला आहे.

सुमीत टिळेकर असे आरोपीचे नाव असून वैभवी गणेश ठुबे राष्ट्रीय खेळाडूचे नाव आहे. याप्रकरणी वानवडी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फातिमा नगर भागातील सिग्नलवर गाडी पुढे नेण्याच्या वादावरुन टिळेकर आणि वैभवी या दोघांमध्ये वाद झाला. या वादानंतर टिळेकर त्यांच्या BMW गाडीतून उतरला आणि त्याने वैभवीला जबर मारहाण केली. या मारहाणीमध्ये वैभवीच्या हाताला गंभीर फ्रॅक्चर झाले आहे.

या प्रकरणावरून मनसेच्या नेत्या रुपाली पाटील यांनी संताप व्यक्त केला आहे.

त्या म्हणाल्या की, 'ती मुलगी खेळाडू असल्याने तिने तो मार सहनही केला. पण आर्मी भरती असो किंवा तिचे पुढील सामने, हात तुटल्यामुळे तिचे भवितव्य टांगणीला लागले आहे. तुम्ही उर्मट आणि घाणेरड्या वृत्तीच्या माणसांना तातडीने अटक करावी अन्यथा मनसे त्यांना फोडेल' असा इशारा मनसे नेत्या रुपाली पाटील यांनी दिला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat