Dailyhunt
पुण्यात तापमान घसरले, सर्वत्र गारवा

पुण्यात तापमान घसरले, सर्वत्र गारवा

प्रभात 6 years ago

पुणे - राज्यात असलेले ढगाळ हवामान दूर झाल्यानंतर किमान तापमानात घट होत आहे. राज्यात मंगळवारी सर्वांत कमी तापमान हे नगर येथे 12.8 अंश सेल्सिअस नोंदविले गेले. पुण्यातही किमान तापमानात घट होऊन ते 15 अंशापर्यंत घसरले आहे. त्यामुळे आता सर्वत्र थंडी जाणवू लागली आहे.

हवामानात वेगाने होत असलेल्या बदलांमुळे तापमानात चढ-उतार सुरू आहेत. दोन दिवस वाढलेले किमान तापमान मंगळवारी पुन्हा कमी झाले. अनेक ठिकाणी तापमान हे सरासरीजवळ आले आहे. उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात गारठा वाढत आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat