Wednesday, 05 Aug, 10.24 am प्रभात

पुणे
पुण्यातही भूमिपूजनाचा आनंदोत्सव

शहरात आज विविध कार्यक्रमांचे आयोजन

पुणे - अयोध्येत राममंदिर भूमिपूजनाचा आनंदोत्सव पुण्यातही अनेक ठिकाणी साजरा केला जाणार आहे. शहरात बुधवारी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, दीपोत्सव, खिरापत वाटप, रांगोळीच्या माध्यमातून श्रीरामांची प्रतिमा आणि हार रेखाटणे अशा विविध माध्यमातून नागरिक या आनंदोत्सवात सहभागी होणार आहे.

संस्कारभारती संस्थेच्या वतीने डिजिटल स्वरूपात 1008 रांगोळ्यांचा हार अर्पण केला आहे. शहरातील विविध भागातील नागरिकांनी काढलेल्या या रांगोळ्या व्हिडिओ स्वरूपात राममंदिर न्यासाकडे पाठवण्यात आल्या आहेत. तर गोखलेनगर येथील मुनित सभागृह येथे प्रभू श्रीरामांची 10 ते 15 फ़ूट रांगोळी साकारली जाणार आहे. वारकरी सांप्रदायातील बाळू धुमाळ यांनी हिंजवडी येथील श्रीराम मंदिरात दुपारी एक वाजता खिरापत वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. भाजप पुणे शहराच्या वतीने सकाळी 10.30 वाजता जंगली महाराज रस्त्यावरील पुणे शहर कार्यालयात आनंदोत्सव साजरा करण्यात येणार आहे.

शहरातील नागरिकांनी घरासमोर श्रीरामतत्त्वाची सात्त्विक रांगोळी काढावी, कुटुंबातील सर्वांनी मिळून सामुहिक श्रीरामरक्षास्तोत्र पठन करावे आणि संध्याकाळी दाराजवळ पणत्या लावाव्यात, असे आवाहन सनातन संस्थेने केले आहे.

तुळशीबाग येथील राममंदिरात विशेष सजावट
अयोध्येतील भूमिपूजन सोहळ्याच्या पार्श्‍वभूमीवर पुण्यातील तुळशीबाग येथील राममंदिर येथे विशेष सजावट केली जाणार आहे. तसेच मंदिराला सजावट देखील केली जाणार आहे. याप्रसंगी प्रभू श्रीरांमांची आरती करणार असल्याची माहिती श्रीरामजी संस्थान तुळशीबागचे विश्‍वस्त भरत तुळशीबागवाले यांनी दिली.

आरती व पुस्तिका वाटप

राममंदिराच्या भूमिपूजनानिमित्त आंनदोत्सव साजरा करण्यासाठी ब्राह्मण महासंघाच्या वतीने बुधवारी सकाळी 11 वाजता सदाशिव पेठेतील रहाळकर श्रीराम मंदिरात आरती होणार आहे. अयोध्या श्रीराम मंदिराचा पूर्ण इतिहास असलेल्या 50 हजार पुस्तिका महाराष्ट्रात वाटप करण्याचे नियोजनही करण्यात आले आहे, अशी माहिती ब्राह्मण महासंघाचे संस्थापक अध्यक्ष आनंद दवे यांनी दिली आहे.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat
Top