Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Purandar News : पुरंदर तालुक्यात विकासाची गंगा आणणार - जालिंदर कामठे

Purandar News : पुरंदर तालुक्यात विकासाची गंगा आणणार - जालिंदर कामठे

प्रभात 8 months ago

प्रभात वृत्तसेवासासवड - पुरंदर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून सर्वसमावेशक विकास साधून तालुक्याला पुणे जिल्ह्यात बारामतीनंतर एक नंबरवर आणण्याचा निर्धार पक्षाने व्यक्त केला आहे.

पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या सहकार्याने पुरंदरचा विकास वेगाने होणार आहे, असे प्रतिपादन पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे यांनी केले.बोपगाव येथे एकूण ४२ लाख रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि उद्घाटन कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ. दिगंबर दुर्गाडे होते.

यावेळी उद्घाटन करण्यात आलेली कामे..
कानिफनाथ रोड काँक्रीटीकरण १०.५० लाख, नांगरी आळी काँक्रीटीकरण १०.५० लाख, जगदाळे आळी काँक्रीटीकरण १०.५० लाख, कानिफनाथ मंदिर पालखी मार्गावर ब्लॉक बसवणे १०.५० लाख आशी ४२ लाख रुपयेयाची कामे करत आली. या सर्व कामांमुळे रस्ते दुरुस्ती मूलभूत सुविधा आणि सार्वजनिक सोयी-सुविधा सुधारणा होऊन गावाचा सर्वांगीण विकास साधला जाईल, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली.

यावेळी कामठे म्हणाले, "पुरंदर तालुक्यातील विकासाचा राहिलेला अनुशेष आता मिटवला जाईल. अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विकासाची गंगा वाहणार आहे." यावेळी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अध्यक्ष डॉ. दिगंबर दुर्गाडे, अमित झेंडे, सरपंच सारिका गुरव, शालन फडतरे, ज्योती फडतरे, ग्रामसेवक राखी ढगारे, मारुतीभाऊ फडतरे, पकाभाऊ फडतरे, योगेश फडतरे, दयानंद फडतरे, संदीप फडतरे, साहेबराव फडतरे, बाळासाहेब फडतरे, रवींद्र फडतरे, बाळू पवार, अशोक फडतरे, सुरज फडतरे, राजेंद्र फडतरे, विजय जगदाळे, विजय फडतरे, शहाजी फडतरे, विश्वास फडतरे, नागेश फडतरे, दीपक फडतरे, दत्तात्रय फडतरे, बाप्पू फडतरे, कानिफनाथ फडतरे, शामराव फडतरे आदी उपस्थित होते.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat