Dailyhunt
Raghav Chadha: राघव चड्ढा यांना मोठा धक्का ; AAP कडून राज्यसभेतील उपनेते पदावरून हकालपट्टी

Raghav Chadha: राघव चड्ढा यांना मोठा धक्का ; AAP कडून राज्यसभेतील उपनेते पदावरून हकालपट्टी

Raghav Chadha: आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार राघव चड्ढा यांना मोठा धक्का बसला आहे. पक्षाकडून मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. आम आदमी पक्षाने राघव चड्डा यांची उपनेतेपदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे.

राघव चड्ढा यांच्या जागी आता लवली प्रोफेशनल युनिव्हर्सिटीचे कुलपती आणि पक्षाचे खासदार डॉ. अशोक कुमार मित्तल हे राज्यसभेत पक्षाचे नवीन उपनेते म्हणून काम पाहणार आहेत. राघव चड्ढा यांच्या संदर्भात राज्यसभा सचिवालयाला एक पत्र पाठवण्यात आले आहे. यापूर्वी त्यांच्याबाबत बरीच अटकळ बांधली जात होती.

राघव गेल्या काही दिवसांपासून ‘आप’ आणि पक्षाच्या शीर्ष नेत्यांशी संबंधित महत्त्वाच्या मुद्द्यांवर मौन बाळगून होते. आता, पक्षाने त्यांना उपनेतेपदावरून हटवले आहे.

राघव चड्ढा यांचे ‘मौन’ आणि राजकीय चर्चा Raghav Chadha:

राघव चड्ढा यांना उपनेतेपदावरून हटवणे हा पक्षातील एक मोठा बदल मानला जात आहे. हे लक्षात घेण्यासारखे आहे की, उत्पादन शुल्क धोरणाच्या मुद्द्यावर पक्षाच्या शीर्ष नेत्यांना नुकताच दिलासा मिळाला असताना, राघव चड्ढा यांनी अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली नाही किंवा सोशल मीडियावर या प्रकरणावर भाष्यही केले नाही. त्यांचे हे मौन पक्षांतर्गत मतभेदांचे लक्षण मानले जात आहे.

Raghav Chadha : राघव चढ्ढा भाजपमध्ये जाणार? संजय सिंह यांनी स्पष्टच सांगितले

अशोक मित्तल यांची नवी जबाबदारी Raghav Chadha:

नवे उपनेते, डॉ. अशोक कुमार मित्तल, हे शिक्षण क्षेत्राची पार्श्वभूमी असलेले एक अनुभवी खासदार आहेत. ते २०२२ मध्ये पंजाबमधून राज्यसभेवर निवडून आले होते. संसदेच्या मागील अधिवेशनांमध्ये त्यांनी कृषी आणि शिक्षण यांसारख्या मुद्द्यांवर जोरदार भूमिका मांडली आहे. अशोक मित्तल यांचा शांत आणि तर्कशुद्ध दृष्टिकोन राज्यसभेत पक्षाचा अजेंडा किती प्रभावीपणे पुढे नेईल, हे पाहणे बाकी आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat