Dailyhunt
Rahata Crime : राहाता हादरलं! वीरभद्र यात्रेत अल्पवयीन मुलीचा विनयभंग; भावांनी जाब विचारताच २० जणांचा राडा

Rahata Crime : राहाता हादरलं! वीरभद्र यात्रेत अल्पवयीन मुलीचा विनयभंग; भावांनी जाब विचारताच २० जणांचा राडा

Rahata Crime - यात्रेत अल्पवयीन मुलीच्या पाठीवर हात फिरवून चल वडा खायला, असे म्हणत अश्लील हावभाव करून मुलीला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करण्यात आले. मुलीच्या भावांना लाथा बुक्क्यांनी मारहाण करत शिवीगाळ व दमदाटी करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना राहाता येथील वीरभद्र महाराज यात्रेत घडली.

पीडित मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून राहाता पोलिसांनी आरोपी शंकर किशोर कुऱ्हाडे, रोहित राजेंद्र डुकरे, साहिल विजय कुऱ्हाडे, आदेश साहेबराव माळी यांच्यासह इतर दहा ते पंधरा अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला.

या घटनेत वरील चार आरोपींना पोलिसांनी तातडीने अटक केली. रात्री साडेदहा अकराच्या सुमारास पोलीस स्टेशनसमोर आरोपींच्या बाजूने सुद्धा मोठा जमाव जमला होता.पोलिसांनी प्रयत्न करूनही जमाव हटत नव्हता. अखेर काहींना लाठीचा प्रसाद दिल्यानंतर काही वेळातच जमाव येथून पांगल्याची चर्चा आहे. ३ एप्रिल रोजी राहाता शहराचे ग्रामदैवत श्री वीरभद्र महाराज यात्रेत पीडीत मुलगी तसेच माझे पाच भाऊ असे मिळून यात्रेकरिता गावात आले होते.

यात्रा फिरून झाल्यानंतर भूक लागल्याने रात्री दहा वाजेच्या दरम्यान वीरभद्र मंदिराचे बाजूस दुकानात वडा खाण्यासाठी जात असताना आरोपी शंकर किशोर कुऱ्हाडे याने मुलीकडे पाहून अश्लील हावभाव केले. पाठीवर हात फिरवत म्हणाला की, चल वडा खायला, अशा प्रकारचे लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. याचा जाब पीडित मुलीच्या भावांनी आरोपींना विचारला असता त्याचा राग आल्याने आरोपींनी दहा ते पंधरा अज्ञात व्यक्ती गोळा करून राहाता शहरातील शनी मंदिराचे कमानीजवळ माझ्या भावांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जिवे ठार मारण्याची धमकी दिली.

पीडित मुलीने राहाता पोलिसात दिली आहे. पीडित मुलीच्या फिर्यादीवरून राहाता पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला. आरोपी रोहित राजेंद्र डुकरे, साहिल विजय कुऱ्हाडे, शंकर किशोर कुऱ्हाडे, आदेश साहेबराव माळी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक करीत आहे

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat