Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Rahul Gandhi : राहुल गांधींना विरोधी पक्षनेतेपदावरून हटवण्याची तयारी, निशिकांत दुबे देणार प्रस्ताव

Rahul Gandhi : राहुल गांधींना विरोधी पक्षनेतेपदावरून हटवण्याची तयारी, निशिकांत दुबे देणार प्रस्ताव

प्रभात 1 month ago

Rahul Gandhi : भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर परदेश दौऱ्यांवरून जोरदार टीकास्त्र सोडले. तसेच, राहुल यांना पदावरून हटवण्यासाठीचा प्रस्ताव संसदेत मांडण्याचेही सूतोवाच केले.

(Rahul Gandhi)

भाजपकडून सातत्याने राहुल यांच्या परदेश दौऱ्यांवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले जाते. तो धागा पकडून दुबे यांनी आणखी आक्रमक भूमिका मांडली. राहुल यांनी वर्ष २००४ ते २०२६ या कालावधीत अनेक परदेश दौरे केले. त्या दौऱ्यांविषयी कुणालाही माहिती नाही. (Rahul Gandhi)

ते कुणाला भेटतात हेही कुणाला ठाऊक नाही. त्यामुळे त्यांच्या परदेश दौऱ्यांची चौकशी व्हायला हवी. त्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापण्याची विनंती मी केंद्र सरकारकडे करणार आहे, असे ते सोमवारी संसद भवन परिसरात पत्रकारांशी बोलताना म्हणाले. (Rahul Gandhi)

राहुल परकी शक्तींच्या हातांतील बाहुले बनले आहेत. नियमांनुसार विरोधी पक्षनेत्याने परदेश दौऱ्यांत आपल्या देशाच्या, सरकारच्या धोरणांविषयी बोलायला हवे. (Rahul Gandhi)

Rahul Gandhi : हे आंदोलन भारतीय विद्यार्थ्यांकडून सरकारला दिलेला इशारा; राहुल गांधी यांची टीका

Rahul Gandhi : १० वर्षांत १५२ पेपर लीक; तरुणांचे भविष्य धोक्यात : राहुल गांधी

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat