Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Rajasthan Dust : राजस्थानात निसर्गाचा उद्रेक! ताशी ७० किमी वेगाने धुळीचे वादळ; भरदिवसा पसरला अंधार

Rajasthan Dust : राजस्थानात निसर्गाचा उद्रेक! ताशी ७० किमी वेगाने धुळीचे वादळ; भरदिवसा पसरला अंधार

Rajasthan Dust : राजस्थानच्या सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये आज (३० मे) निसर्गाचा भीतीदायक आणि आश्चर्यकारक अनुभव पाहायला मिळाला. चुरू आणि श्रीगंगानगर परिसरात दुपारी सुमारे २ वाजता अचानक हवामानात मोठा बदल झाला आणि प्रचंड वाळू-धुळीचे वादळ उसळले.

काही क्षणांतच आकाश काळवंडले आणि भरदिवसा अंधार पसरला, ज्यामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले. (Rajasthan Dust)

या धुळीच्या वादळामुळे दृश्यमानता जवळपास शून्यावर आली. रस्त्यांवरील वाहने जागेवर थांबली, तर चालकांना पुढील काही मीटरही दिसत नसल्याने हेडलाइट्सचा आधार घ्यावा लागला. अनेक भागांमध्ये नागरिकांनी सुरक्षिततेसाठी घरातच थांबणे पसंत केले. (Rajasthan Dust)

हवामान विभाग आणि स्थानिक सूत्रांच्या माहितीनुसार, या वादळादरम्यान वाऱ्याचा वेग ताशी सुमारे ७० किमी इतका नोंदवला गेला. जवळपास 30 मिनिटे वाळू आणि धुळीचे ढग आकाशात फिरत राहिले, ज्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. (Rajasthan Dust)

या वादळानंतर लगेचच हवामानाने वेगळेच रूप घेतले. धूळ खाली बसताच आकाश ढगाळ झाले आणि अनेक भागांमध्ये हलक्या ते जोरदार पावसाला सुरुवात झाली. काही दिवसांपासून ४५ अंश सेल्सिअसच्या वर असलेले तापमान अचानक खाली आले. हवामान विभागानुसार, या बदलामुळे तापमानात सुमारे ८ अंश सेल्सिअसपर्यंत घट झाली असून, नागरिकांना उष्णतेपासून मोठा दिलासा मिळाला आहे. (Rajasthan Dust)

Weather update : पुढचे 24 तास महत्वाचे! हवामान विभागाकडून ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट जारी

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat