Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Rajasthan Royals Controversy : राजस्थान रॉयल्सच्या मालकीवरुन पेटला नवा वाद! मित्तल-पूनावालाच्या खरेदीवर सोमानी समूहाने घेतला आक्षेप

Rajasthan Royals Controversy : राजस्थान रॉयल्सच्या मालकीवरुन पेटला नवा वाद! मित्तल-पूनावालाच्या खरेदीवर सोमानी समूहाने घेतला आक्षेप

प्रभात 1 month ago

Rajasthan Royals Controversy faces legal challenge : आयपीएलमधील 'राजस्थान रॉयल्स' (RR) संघाच्या मालकीबाबत एक मोठी उलथापालथ झाली आहे. उद्योगपती लक्ष्मी निवास मित्तल, त्यांचे सुपुत्र आदित्य मित्तल आणि सीरम इन्स्टिट्यूटचे प्रमुख अदार पूनावाला यांनी मिळून १.६५ अब्ज डॉलर्स (अंदाजे १५,६०० कोटी रुपये) इतक्या मोठ्या रकमेची गुंतवणूक करून राजस्थान रॉयल्समध्ये मोठी हिस्सेदारी मिळवली आहे.

मात्र, सोमानी समूहाच्या नेतृत्वाखालील कंसोर्टियमने या प्रक्रियेवर गंभीर आक्षेप घेतले आहेत.

सोमानी समूहाचा आक्षेप आणि कायदेशीर नोटीस –

या नवीन रचनेनुसार, मित्तल कुटुंबाकडे ७५ टक्के, अदार पूनावाला यांच्याकडे १८ टक्के, तर जुने गुंतवणूकदार मनोज बदाले यांच्याकडे उर्वरित ७ टक्के हिस्सा असणार आहे. राजस्थानात जन्मलेले लक्ष्मी निवास मित्तल यांनी या गुंतवणुकीबद्दल आनंद व्यक्त केला असला, तरी लगेचच या कराराला कायदेशीर आव्हान मिळताना दिसत आहे. सोमानी समूहाच्या नेतृत्वाखालील कंसोर्टियमने या प्रक्रियेवर गंभीर आक्षेप घेतले आहेत.

सोमानी समूहाच्या दाव्यानुसार, ते गेल्या १० दिवसांपासून हा करार पूर्ण करण्यासाठी तयार होते. मात्र, मित्तल यांच्यासोबत ‘साइड डीलिंग’ करण्यासाठी त्यांना हेतुपुरस्सर बाजूला ठेवले गेले. सोमानी समूहाने या व्यवहारातील पारदर्शकतेवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यांच्या मते, नियमांना धाब्यावर बसवून हा करार करण्यात आला आहे. सोमानी समूह आजच या विरोधात कायदेशीर नोटीस बजावणार असून, या प्रकरणाची माहिती बीसीसीआयलाही दिली जाणार आहे.

- Evan Speechly Honor : विराट कोहलीही झाला भावुक; आरसीबीने १८ वर्षे सेवा देणाऱ्या 'या' दिग्गज व्यक्तीचा केला खास सन्मान

जागतिक ऑपरेशन्सवरही परिणाम होण्याची शक्यता –

राजस्थान रॉयल्स ही केवळ आयपीएलपुरती मर्यादित नसून, ते दक्षिण आफ्रिकेतील ‘पार्ल रॉयल्स’ आणि कॅरेबियन प्रीमिअर लीगमधील ‘बार्बाडोस रॉयल्स’ या जागतिक संघांचेही संचालन करतात. त्यामुळे या कायदेशीर लढाईचा फटका त्यांच्या जागतिक स्तरावरील व्यवहारांनाही बसू शकतो.

– Nicholas Pooran Records : निकोलस पूरनने मुंबईविरुद्ध झळकावले वादळी अर्धशतक! वैभव सूर्यवंशीचा मोडला खास विक्रम

नवीन संचालक मंडळात लक्ष्मी मित्तल, आदित्य मित्तल, वनीषा मित्तल-भाटिया आणि अदार पूनावाला यांच्यासह मनोज बदाले यांचा समावेश आहे. जुने गुंतवणूकदार मनोज बदाले यांनी या नवीन भागीदारांचे स्वागत केले असले, तरी सोमानी समूहाच्या आक्रमक पवित्र्यामुळे या बहुचर्चित कराराचे भवितव्य आता न्यायालयाच्या निर्णयावर आणि बीसीसीआयच्या भूमिकेवर अवलंबून असणार आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat