Thursday, 17 Oct, 9.54 am प्रभात

मुखपृष्ठ
राजीव गांधी एसआरए परिसर समस्यामुक्‍त करणार - कांबळे

पुणे कॅन्टोन्मेंट - कासेवाडी येथील राजीव गांधी वसाहतीत (एसआरए) अनेक समस्या आहेत. पाणी, ड्रेनेज लाइन, सतत खंडित होणारा वीजपुरवठा अशा अनेक पायाभूत सुविधाही येथे नसल्याच्या तक्रारी होत आहेत. त्या सोडवण्यास आपले प्राधान्य राहणार असल्याचे महायुतीचे पुणे कॅन्टोन्मेंटमधील उमेदवार सुनील कांबळे यांनी मतदारांशी संवाद साधताना सांगितले.

कांबळे यांच्या प्रचारार्थ या भागात प्रचार फेरी काढण्यात आली होती. यावेळी त्यांनी मतदारांशी संवाद साधला.

कांबळे यांची फेरी बुधवारी चुडामण तालीम परिसर येथून सुरू झाली. ही पदयात्रा हरकानगर, गुरुनाथनगर, महात्मा फुले सोसायटी, कल्याण सोसायटी, शांतीनगर, टिंबर मळा, म्हसोबा मंदिर, राजीव गांधी वसाहत, मामुजी कॉलनी, कादरी पॅलेस परिसरातून गेली. पेस्तनजी दवाखाना परिसरात या पदयात्रेचा समारोप करण्यात आला. नगरसेविका मनीषा लडकत, अर्चना पाटील, माजी नगरसेवक संदीप लडकत, माजी नगरसेवक सुधीर जानजोत, रफिक शेख, शिवसेनेच्या पद्मा सोरटे, तुषार पाटील आदी उपस्थित होते.

कांबळे यांनी आपली प्रचाराची मतदारसंघातील पहिली फेरी पूर्ण केली असून या कालावधीत मुस्लीम, बहुजन, मेहतर अशा सर्वच समाजातील नागरिकांनी वेगवेगळ्या वस्त्यांमध्ये आपल्याला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचेही ते म्हणाले.

रामदास आठवले, सनी देओल यांच्या रोड शोला प्रतिसाद
कांबळे यांच्या प्रचारासाठी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले आणि अभिनेता तथा खासदार सनी देओल यांनी मंगळवारी रोड शो काढला. या दोघांना पाहण्यासाठी मतदारांनी मोठी गर्दी केली होती. भाजपच्या स्टार प्रचारक ऍड. माधवी नाईक, सरचिटणीस गणेश बीडकर, रिपाइंचे नीलेश आल्हाट यांच्यासह महायुतीचे शेकडो कार्यकर्ते या रोड शोमध्ये सहभागी झाले.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat
Top
// // // // $find_pos = strpos(SERVER_PROTOCOL, "https"); $comUrlSeg = ($find_pos !== false ? "s" : ""); ?>