Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Rajkummar Rao: बॉलिवूडमध्ये गोड बातमी: राजकुमार राव आणि पत्रलेखा झाले आई-बाबा

Rajkummar Rao: बॉलिवूडमध्ये गोड बातमी: राजकुमार राव आणि पत्रलेखा झाले आई-बाबा

प्रभात 6 months ago

Rajkummar Rao : बॉलिवूडमधून आज सकाळी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. अभिनेता राजकुमार राव आणि त्यांची पत्नी, अभिनेत्री पत्रलेखा पालक बनले आहेत. पत्रलेखाने आज सकाळी एका गोंडस मुलीला जन्म दिला असून, ही खुशखबर स्वतः या जोडप्याने त्यांच्या सोशल मीडियावर शेअर केली आहे.

लग्नाच्या चौथ्या वाढदिवशीच मिळालं खास गिफ्ट

राजकुमार आणि पत्रलेखाने इंस्टाग्रामवर एक पोस्ट करून लिहिलं आहे, "आज आम्ही खूप आनंदी आहोत. देवाने आम्हाला एका मुलीचा आशीर्वाद दिला आहे."
आजच त्यांच्या लग्नाची चौथी वर्षगाठ असल्याने हा दिवस आणखी खास झाला आहे. राजकुमारने कॅप्शनमध्ये लिहिलं, "आमच्या चौथ्या लग्नाच्या वाढदिवशी देवाने आम्हाला सर्वात सुंदर भेट दिली."

सेलिब्रिटींकडून शुभेच्छांचा वर्षाव

ही खुशखबर समोर येताच सेलिब्रिटी आणि चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाला आहे. अभिनेता अली फजलने कमेंट करत लिहिलं, "खूप आनंदाची बातमी! दोघांनाही मनःपूर्वक शुभेच्छा."

चार वर्षांपूर्वी केला होता विवाह

राजकुमार राव आणि पत्रलेखा यांनी 15 नोव्हेंबर 2021 रोजी चंदीगडमध्ये सात फेरे घेतले होते. लग्नापूर्वी ते जवळपास 11 वर्षे एकमेकांना डेट करत होते. राजकुमारला पत्रलेखा पहिल्या नजरेतच आवडली होती; मात्र तिला राजी करण्यासाठी त्यांना थोडा वेळ लागला होता. त्यांच्या प्रेमकथेची चर्चा त्यांनी अनेकदा मुलाखतीत केली आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat