Dailyhunt
Rajya Sabha Oath : नवनिर्वाचित राज्यसभा सदस्यांचा आज शपथविधी सोहळा; शरद पवारांसह 'हे' नेते घेणार खासदारकीची शपथ

Rajya Sabha Oath : नवनिर्वाचित राज्यसभा सदस्यांचा आज शपथविधी सोहळा; शरद पवारांसह 'हे' नेते घेणार खासदारकीची शपथ

Rajya Sabha Oath : विविध राज्यातील नवनिर्वाचित राज्यसभा सदस्यांचा आज 6 एप्रिल 2026 रोजी शपथविधी सोहळा पार पडणार आहे.

यात ज्येष्ठ नेते शरद पवार, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, रामराव वडकुते , माया ईवनाते आणि ज्योती वाघमारे या महाराष्ट्रातील नेत्यांचाही समावेश आहे.

ज्यसभेचे सभापती आणि उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन या नव्या सदस्यांना शपथ देणार आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार कालच दिल्लीमध्ये दाखल झाले आहेत. या विशेष कार्यक्रमासाठी ते दिल्लीत उपस्थित राहणार आहेत. शरद पवार पुन्हा एकदा वरिष्ठ सभागृहात आपली भूमिका बजावण्यासाठी सज्ज झाले आहेत.

दरम्यान, भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे अधिकृतपणे राज्यसभा सदस्य म्हणून 10 एप्रिलला शपथ घेण्याची शक्यता आहे आहे. तर पार्थ पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज्यसभेवर पहिल्यांदाच निवड झाली आहे. पार्थ पवार 9 एप्रिलला शपथ घेतील. Rajya Sabha Oath

महाराष्ट्रातील सात राज्यसभा सदस्यांची नावे
विनोद तावडे – भाजप (महायुती)
रामदास आठवले – भाजप (महायुती)
माया चिंतामण ईवनाते – भाजप (महायुती)
रामराव वडकुते – भाजप (महायुती)
ज्योती वाघमारे – शिवसेना शिंदे गट
पार्थ पवार – राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट
शरद पवार – राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार (महाविकास आघाडी)

16 मार्च 2026 रोजी मतदान प्रक्रिया पार पडली

दरम्यान, केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या 37 जागांसाठी द्विवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला होता, यामध्ये महाराष्ट्रातील 7 जागांचा समावेश होता.

महाराष्ट्रासोबतच ओडिसा, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, आसाम, बिहार, छत्तीसगड, हरियाणा, हिमाचल प्रदेश आणि तेलंगणा या राज्यांतील रिक्त होणाऱ्या 16 मार्च 2026 रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. त्यानंतर आज नवनिर्वाचित राज्यसभा सदस्यांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. Rajya Sabha Oath

Pune Metro : मेट्रो धावणार अन् पर्यावरणही जपणार! हिंजवडी मेट्रो प्रकल्पाचा 'ग्रीन' पॅटर्न; ५,५०० झाडे १००% जगली

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat