Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
रशियातील 212 भारतीयांना इंडिगोच्या विमानातून आणले

रशियातील 212 भारतीयांना इंडिगोच्या विमानातून आणले

प्रभात 6 years ago

नवी दिल्ली: रशियात अडकून पडलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी इंडिगो कंपनीने एक चार्टर्ड फ्लाईट मॉस्कोला पाठवले होते. त्यातून 212 भारतीयांना परत आणण्यात आले असल्याची माहिती इंडिगोच्यावतीने देण्यात आली आहे.

या प्रवाशांमध्ये प्रामुख्याने विद्यार्थ्यांचाच समावेश होता. हे विमान प्रथम अमृतसरला आणि नंतर कोचीला उतरवण्यात आले. करोनामुळे अद्यापही आंतरराष्ट्रीय विमान
सेवा बंद आहे. त्यामुळे जगाच्या अनेक भागात अजूनही अनेक भारतीय अडकून पडले आहेत. त्यांना परत आणण्यासाठी वंदे भारत मिशन सुरू असले, तरी अनेक विमान कंपन्यांनी चार्टर्ड विमान सेवाही उपलब्ध करून दिली आहे.

अनेक भारतीय त्याचा लाभ घेत आहेत.

नागरी विमान वाहतूक खात्याच्या अनुमतीने ही विमाने सोडली जात आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat