Saturday, 17 Aug, 7.46 am प्रभात

मुख्य पान
राष्ट्रपतींनी दिली सेवाग्राम आश्रमातील बापू कुटीला भेट

वर्धा - देशाचे राष्ट्रपती 'रामनाथ कोविंद' यांनी आज सकाळी 11 च्यासुमारास वर्ध्यातील सेवाग्राम आश्रमाला भेट दिली. आश्रम प्रतिष्ठानच्या वतीन राष्ट्रपतींच स्वागतं करण्यात आलं. यावेळी राष्ट्रपती कोविंद यांच्यासह त्यांच्या पत्नी सविता, मुलगी स्वाती, राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आश्रम प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रभू उपस्थित होते.

यावेळी राष्ट्रपतींनी आश्रमातील अंबर चरखा चालवत सूतकताई केली. सेवाग्राम येथे महात्मा गांधीजींच्या आश्रम परिसरातील आदी निवास, बा कुटी, बापू कुटी, खादी निर्मिती केंद्र आदी ठिकाणी भेट राष्ट्रपतींनी भेट दिली.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat
Top