Tuesday, 09 Mar, 10.13 am प्रभात

मुखपृष्ठ
रेसिपी : अशी बनवा शाही काजू बर्फी

साहित्य ः काजू एक वाटी, दीड वाटी साखर, अर्धी वाटी खवा, वेलदोडापूड पाव चमचा.

कृती ः काजूची मिक्‍सरवर पूड करून घ्यावी. खवा हाताने मळून घ्यावा. काजूची पूड, साखर व खवा, पाव वाटी दूध असे एकत्र करून शिजत ठेवावे. गोळा कडेने कोरडा होऊ लागलेला दिसताच गॅस बंद करून मिश्रण कोमट होईपर्यंत घोटावे. ताटाला किंवा पोळपाटाला तुपाचा हात लावून त्यावर मिश्रण ओतावे व वड्या कापाव्यात. खव्यामुळे वड्यांचे मिश्रण लवकर तयार होते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat
Top