Dailyhunt
रिझर्व्ह बॅंकेचे आर्थिक वर्ष आता एप्रिलपासून

रिझर्व्ह बॅंकेचे आर्थिक वर्ष आता एप्रिलपासून

प्रभात 6 years ago

पुणे - सध्या रिझर्व्ह बॅंकेचे आर्थिक वर्ष जुलैपासून सुरू होते. तर सरकारचे आर्थिक वर्ष दि. 1 एप्रिलपासून सुरू होते. ही पद्धत अनेक वर्षांपासून चालत आहे. मात्र, आता रिझर्व्ह बॅंक आपले आर्थिक वर्ष जुलैऐवजी एप्रिलपासून सुरू करणार आहे. याची अंमलबजावणी 2020-21पासून सुरू होणार आहे.

रिझर्व्ह बॅंकेसह केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक नुकतीच झाली. यामध्ये इतर आणि या विषयावर चर्चा झाली आणि असा प्रस्ताव केंद्र सरकारला पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला. केंद्र सरकारने या अगोदर अर्थसंकल्प एक महिना अगोदर म्हणजे दि. 1 फेब्रुवारी रोजी सादर करण्याचा निर्णय घेतलेला असून त्याची अंमलबजावणी दोन वर्षापासून सुरू आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat