Thursday, 06 Aug, 12.27 pm प्रभात

ताज्या बातम्या
रिकाम्या वेळेत सुनील शेट्टी करतो 'हे' काम

मुंबई - बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टीच्या सोशल मीडियावरील पोस्ट नेहमीच चर्चेत असतात. त्याच्याबद्दल जाणून घेण्यासाठी सोशल मीडिया युजर्स नेहमीच उत्सुक असतात. यातच सुनील शेट्टीने इंस्टाग्रामवर शेअर केलेला व्हिडीओ आणि फोटो इंटरनेटवर खूपच व्हायरल झाला आहे.

View this post on Instagram

What a wonderful world ❤️ #bepositive #bepresent

A post shared by Suniel Shetty (@suniel.shetty) on

नुकताच सुनील शेट्टीने त्याच्या इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर केला आहे. या फोटोमध्ये तो 'मी टाइम' इंजॉय करताना दिसून येत. निसर्गाच्या सानिध्यात तो सायकल चालवत आहे, तसेच माशांना खाणं टाकताना दिसत आहे.

या व्हिडियोला शेअर करत तो म्हणाला आहे कि,'मला मिळालेला वेळ मी आवडत्या गोष्टी करण्यात घालवतो.' हा व्हिडियो शेअर करतांना त्याने आपल्या फॅन्सला 'हे जग किती सुंदर' आहे .असा पॉसिटीव्ह मेसेज दिला आहे. हा व्हिडीओ सुनील शेट्टीच्या फार्म हाऊसवरील असल्याचे म्हटले जात आहे.

View this post on Instagram

Staying PAW-SITIVE 👊🏽

A post shared by Suniel Shetty (@suniel.shetty) on

वर्कफ्रंटबाबत सांगायचे झाल्यास सुनील शेट्टी हेरा फेरी या चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तसेच या चित्रपटात अक्षय कुमार, परेश रावल आणि सुनील शेट्टी यांची मजामस्ती पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat
Top