Dailyhunt
Rohit Pawar : अजित पवार विमान अपघात प्रकरण; कर्नाटकने दाखल केलेल्या FIR मध्ये काय काय? रोहित पवार म्हणतात "आता महाराष्ट्र पोलिसांची."

Rohit Pawar : अजित पवार विमान अपघात प्रकरण; कर्नाटकने दाखल केलेल्या FIR मध्ये काय काय? रोहित पवार म्हणतात "आता महाराष्ट्र पोलिसांची."

प्रभात 1 month ago

Rohit Pawar : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी आमदार रोहित पवार सातत्याने करत होते. अखेर 23 मार्च 2026 रोजी त्यांच्या लढ्याला यश आले आहे.

अजित पवार यांच्या विमान अपघाताची तक्रार बंगळुरू (कर्नाटक) पोलिसांनी घेतली आहे.

बंगळूरु पोलिसांनी झीरो एफआयआर दाखल केली असून, या एफआयआरमध्ये हा केवळ अपघात नसून एक “मोठा गुन्हेगारी कट” असल्याचा आरोप करण्यात आला आहे. आता ही तक्रार महाराष्ट्र पोलिसांकडे वर्ग करण्यात आली आहे.

Zero FIR मध्ये काय म्हटले आहे ?

कर्नाटकामधील बेंगळुरू येथे नोंदवण्यात आलेल्या Zero FIR मध्ये या अपघातामागे केवळ तांत्रिक बिघाड नसून मोठ्या प्रमाणावर कटकारस्थान असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.

FIR मध्ये भारतीय न्याय संहितेअंतर्गत खून,निष्काळजीपणामुळे मृत्यू, कटकारस्थान, पुरावे नष्ट करणे आणि बनावट कागदपत्र तयार करणे यांसारख्या गंभीर कलमांचा समावेश करण्यात आला आहे. आता ही झिरो एफआयआर महाराष्ट्र पोलिसांकडे वर्ग करण्यात आली असून, पोलिस कोणती अॅक्शन घेणारे हे पाहावे लागणार आहे.

याही गोष्टींचा उल्लेख

विमानाच्या सुरक्षिततेच्या नियमांचे उल्लंघन.

उड्डाणाच्या वेळी आवश्यक असलेल्या दृश्यता मर्यादेपेक्षा कमी परिस्थितीत लँडिंगला परवानगी देण्यात आली होती.

विमानाच्या वापराच्या तासांमध्ये विसंगती. (अधिकृत नोंदी आणि प्रत्यक्ष वापर यात फरक)

पायलटची शेवटच्या क्षणी केलेली बदल.

संबंधित पायलटच्या शिस्तभंगाच्या इतिहासाबाबतही शंका.

ही केवळ दुर्घटना नसून गंभीर निष्काळजीपणा आणि संभाव्य गैरव्यवहारामुळे घडलेली घटना असू शकते, म्हणून सखोल गुन्हेगारी तपास करण्याची मागणी या झीरो एफआयआरमध्ये करण्यात आली आहे.

झिरो FIR म्हणजे काय?

जेव्हा एखादी तक्रार घटनास्थळाच्या हद्दीत नसलेल्या पोलीस ठाण्यात नोंदवली जाते, तेव्हा त्याला ‘झीरो एफआयआर’ म्हणतात. यावर ‘0’ नंबर टाकला जातो, कारण त्याचा अनुक्रमांक नंतर मूळ पोलीस ठाण्यात निश्चित होतो. झीरो एफआयआर म्हणजे गुन्हा कोणत्याही पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेला असो, तो कोणत्याही पोलीस ठाण्यात नोंदवला जाऊ शकतो.

रोहित पवारांचे ट्वीट

अजितदादांच्या विमान अपघाताबाबत महाराष्ट्रात FIR दाखल होऊन त्यांना न्याय मिळू शकला नसला तरी काल (सोमवार, दि. २३ मार्च) कर्नाटकमधील पोलीस ठाण्यात झिरो नंबरने FIR दाखल करुन तो महाराष्ट्र पोलिसांकडं वर्ग करण्यात आला, याबाबत कर्नाटक पोलिसांचे आभार. आता महाराष्ट्र पोलिसांची जबाबदारी वाढली असून या FIR चा तपास कशा पद्धतीने होतो याकडं आम्ही बारकाईने लक्ष ठेवू…!

हा तपास निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीनेच झाला पाहिजे आणि अजितदादांच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या मग भले ती कितीही मोठी शक्ती असली तरी त्यांना शिक्षा झालीच पाहिजे, यासाठी शेवटपर्यंत लढू आणि जिंकू!

Govt Considers Expanding Lok Sabha : लोकसभेच्या जागा ५४३ वरून ८१६ होणार? महाराष्ट्रात आता खासदारांची संख्या किती?

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat