Rohit Pawar : नाशिकमधील बहुचर्चित भोंदू बाबा अशोक खरातच्या काळ्या कारनाम्यांची लिस्ट मोठी आहे. या प्रकरणाचा कसून तपास सुरू असून, एसआयटी अनेक बाबी पडताळत आहे.
राजकीय नेत्यांसोबत अशोक खरातचे फोटो समोर आल्यानंतर या प्रकरणाने मोठी खळबळ उडवून दिली.
खरातवर महिलांचे लैंगिक शोषणासह, आर्थिक फसवणुकीचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याला नाशिक जिल्हा न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
या प्रकरणात दररोज नवीन धक्कादायक माहिती समोर येत आहे. अशातच काल सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मोठा बॉम्ब टाकला. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
भोंदू खरातला कुणाचे सर्वाधिक फोन कॉल झाले, कोणत्या नेत्याशी तो कितीवेळ बोलला. त्याने कोणत्या नेत्याला कितीदा फोन केले. याची इत्यंभूत माहिती अंजली दमानिया यांनी बाहेर आणली. त्यांनी कॉल डिटेल रेकॉर्ड (CDR) जाहीर केला आहे.
तसेच या प्रकरणात अशोक खरातचे ऑस्ट्रेलिया, दुबई यासह चार पाच देशात हवालाच्या माध्यमातून Money Laundering करत असल्याची माहिती समोर आली असून, यावर आमदार रोहित पवार यांनी ट्वीट करत प्रतिक्रिया देत मोठी मागणी केली आहे.
खरातने भ्रष्ट अधिकारी आणि भ्रष्ट राजकीय नेत्यांचे हजारून अधिक कोटी या देशांमध्ये पाठवले असल्याचं कळत आहे. खरात हा केवळ भोंदू नाही तर एक मोठे nexus आहे, असा दावा रोहित पवारांनी ट्वीटमध्ये केला आहे.
या प्रकरणाची केंद्रीय संस्थानी सुद्धा चौकशी करणे गरजेचं असल्याचे मत रोहित पवारांनी ट्वीटमध्ये व्यक्त केले आहे.
आमदार रोहित पवारांचं ट्वीट
भोंदू खरात ऑस्ट्रेलिया, दुबई यासह चार पाच देशात हवालाच्या माध्यमातून Money Laundering करत असल्याची तसंच खरातने भ्रष्ट अधिकारी आणि भ्रष्ट राजकीय नेत्यांचे हजारून अधिक कोटी या देशांमध्ये पाठवले असल्याचं कळत आहे.
खरात हा केवळ भोंदू नाही तर एक मोठे nexus आहे, त्यामुळे या प्रकरणाची केंद्रीय संस्थानी सुद्धा चौकशी करणे गरजेचं आहे.
हा विषय राष्ट्रीय सुरक्षेला सुद्धा आवाहन देणारा असल्याने राज्य सरकारकडे पुरेसे पुरावे आले असतील तर गृह विभागाने देखील या प्रकरणाचा राजकीय गोळाबेरजेसाठी वापर न करता सखोल चौकशी केली पाहिजे. असो! या प्रकरणातही ED सारख्या यंत्रणांना जाग येईल, ही अपेक्षा!
World Rat Day: लहानसा उंदीर, पण जगभर सत्ता! 'वर्ल्ड रॅट डे' निमित्त जाणून घ्या भन्नाट गोष्टी!

