Sunday, 24 Jan, 10.21 am प्रभात

मुखपृष्ठ
"RSS महिलांचा आदर करत नाही" राहुल गांधींची जळजळीत टीका

कोईमतूर -कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी शनिवारी तामीळनाडूतील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाच्या प्रचाराचे रणशिंग फुंकले. त्यावेळी त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारांवर टीकेची झोड उठवली. आरएसएसमध्ये महिलांचा सन्मान नाही, ही पुरुषवादी संघटना आहे. असा आरोप त्यांनी केला.


तामीळनाडूत एप्रिल-मेमध्ये निवडणूक अपेक्षित आहे. त्या निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी कॉंग्रेसजनांचे मनोबल उंचावण्याच्या उद्देशातून राहुल तामीळनाडूच्या तीन दिवसीय दौऱ्यासाठी दाखल झाले. विशेष व्हॅनमधून विविध ठिकाणी जात त्यांनी तामीळी जनतेपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी केलेल्या भाषणांत त्यांनी प्रामुख्याने मोदींसह rss वर लक्ष्य केले.

ते म्हणाले,'आरएसएसमध्ये महिलांना समाविष्ट होण्याची परवानगी नाही. कारण यामध्ये सुरुवातीपासून महिलांशी भेदभाव केला जात होता. कित्येक वर्षापासून हि संघटना देशात असून हि फक्त पुरुषवादी आहे. तर त्यांनी महिलांचा आदर केला असता तर नक्कीच त्यांचा समावेश करून घेतला असता.' असा घणाघात राहुल गांधी यांनी केला आहे.

ते पुढे म्हणाले,'कुणालाही विकत घेऊ शकतो आणि घाबरवू शकतो, असे मोदींना वाटते. तामीळनाडू सरकारचे नियंत्रण मोदींकडे आहे. राज्यातील जनतेबाबतही तसे करता येईल असे त्यांना वाटते. मात्र, तामीळी जनता तसे होऊ देणार नाही.' असं म्हणत त्यांनी मोदी सरकार हल्लाबोल केला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat
Top