Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Rupali Chakankar : 'काँग्रेसचा खरा चेहरा समोर आला'; सुनेत्रा पवारांवरील टीकेवर रुपाली चाकणकरांचा घणाघात

Rupali Chakankar : 'काँग्रेसचा खरा चेहरा समोर आला'; सुनेत्रा पवारांवरील टीकेवर रुपाली चाकणकरांचा घणाघात

Rupali Chakankar on Congress : बीडमधील कायदा आणि सुव्यवस्थेच्या मुद्द्यावरून सुरू झालेला वाद आता राज्याच्या राजकारणात मोठ्या संघर्षाचे रूप घेताना दिसत आहे. (Rupali Chakankar)

बीड येथील पत्रकार परिषदेदरम्यान एका पत्रकाराला प्रश्न विचारण्यापासून मंत्री धनंजय मुंडे यांनी रोखल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर काँग्रेसने महायुती सरकारवर जोरदार टीका केली.

मात्र, या टीकेदरम्यान उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याविषयी वापरण्यात आलेल्या 'गुंगी गुडीया' या शब्दप्रयोगामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे.

बीड येथील पत्रकार परिषदेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधत, “बीडमध्ये हुकूमशाही सुरू आहे का?” असा सवाल उपस्थित केला. याचवेळी सुनेत्रा पवार यांचाही उल्लेख 'गुंगी गुडीया' असा करण्यात आल्याने यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी तीव्र आक्षेप नोंदवला. (Rupali Chakankar)

या उल्लेखावरुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली असून, नेत्यांकडून देखील टीकेचा निषेध नोंदवण्यात येत आहे. यावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांनी काँग्रेसच्या वक्तव्याचा निषेध नोंदवला. ( Rupali Chakankar )

“विचारांनी पराभूत झाल्यावर महिलांचा अपमान करणे ही काँग्रेसची जुनी पद्धत आहे,” असं म्हणत रुपाली चाकणकर यांनी काँग्रेसने खडेबोल सुनावले. त्या म्हणाल्या “आदरणीय दादांच्या पश्चात त्यांच्या पत्नी आणि महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री असलेल्या सुनेत्रा वहिनींची खिल्ली उडवणं यातुन, काँग्रेसच्या विकृत मानसिकतेचे दर्शन होत आहे.” (Rupali Chakankar)

काँग्रेसने आपल्या या वक्तव्याबद्दल माफी मागावी अशी मागणी देखील रुपाली चाकणकर यांनी केली आहे. “महिलांचा सन्मान ही महाराष्ट्राची परंपरा आहे. दुर्दैवाने आज स्वतःला पुरोगामी म्हणवून घेणाऱ्या काँग्रेसनेच महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री आदरणीय सुनेत्रावहिनी यांच्याविषयी वापरलेली भाषा ही अत्यंत निंदनीय आणि निषेधार्ह आहे.” (Rupali Chakankar)

स्व.अजितदादांच्या पश्चात अत्यंत कठीण परिस्थितीत त्यांनी जबाबदारी स्वीकारली, वैयक्तिक दुःखावर मात करत जनतेच्या सेवेसाठी स्वतःला समर्पित केले.अशा एका महिलेचा सन्मान करण्याऐवजी तिचा अपमान करण्याची काँग्रेसची मानसिकता महाराष्ट्र कधीच स्वीकारणार नाही. ( Rupali Chakankar )

एखाद्या महिलेच्या कर्तृत्वाला उत्तर देता येत नसेल, तर तिच्यावर वैयक्तिक टीका करून तिचा अवमान करणे ही काँग्रेसची राजकीय संस्कृती आहे का? असा संतप्त सवाल करत महिलांच्या सन्मानाच्या नावाने राजकारण करणाऱ्यांनी आज स्वतःच आपला खरा चेहरा महाराष्ट्रासमोर उघड केला आहे, असं रुपाली चाकणकर यांनी सोशल मीडियावरील पोस्टच्या माध्यमातून काँग्रेसवर हल्लाबोल केला. ( Rupali Chakankar )

Monsoon Care: डेंग्यूचा वाढता धोका! लहान मुलांमध्ये दिसणारी 'ही' लक्षणे अजिबात दुर्लक्षित करू नका

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat