प्रभात

समग्र शिक्षा योजनेसाठी साडेतेरा कोटी

समग्र शिक्षा योजनेसाठी साडेतेरा कोटी
  • 809d
  • 00

पुणे - समग्र शिक्षा योजनेअंतर्गत प्राथमिक शिक्षण विभागातील विद्यार्थ्यांना मोफत गणवेश पुरविण्यासाठी 13 कोटी 53 लाख रुपयांचा निधी वितरीत करण्यास शालेय शिक्षण विभागाने मान्यता दिली.

या योजनेसाठी केंद्र व राज्य शासनाच्या हिस्स्याचे प्रमाण 60:40 असे आहे. केंद्र शासनाने 121 कोटी 87 लाख रुपयांचा निधी राज्याच्या एकत्रित निधीत जमा केला आहे. या निधीच्या प्रमाणात राज्य हिस्स्याचा निधी 81 कोटी 25 लाख रुपये इतका येतो.

महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेच्या राज्य प्रकल्प संचालकांनी केंद्र व राज्य हिस्सा निधी वितरीत करण्याचा प्रस्ताव शासनास सादर केला होता. राज्य हिस्स्याच्या अर्थसंकल्पीय तरतूदीच्या 30 टक्‍के निधी वितरणास मान्यता दिली आहे.

No Internet connection

Link Copied