Tuesday, 12 Feb, 6.21 pm प्रभात

मुख्य पान
सामान्य काँग्रेस कार्यकर्ता 'पंतप्रधान'पदी बसू शकतो का? : अमित शाह

गोध्रा : भाजप अध्यक्ष माहित शाह यांनी आज प्रियंका यांच्या सक्रिय राजकारणातील प्रवेशावरून काँग्रेसवर घराणेशाहीचे आरोप लावले. एका कार्यक्रमामध्ये भाजप कार्यकर्त्यांना संबोधित करताना शाह म्हणाले की, 'एखाद्या सामान्य काँग्रेस कार्यकर्त्याला पंतप्रधान पदापर्यंत मजल मारू शकतो का? काँग्रेसमध्ये पंतप्रधान पद हे एकाच कुटुंबासाठी राखीव असल्याने ते केवळ 'जन्मानेच' प्राप्त होऊ शकते.'

यावेळी बोलताना त्यांनी भारतीय जनता पक्षातील लोकशाही वातावरणाचे कौतुक करत, 'भारतीय जनता पक्षामध्ये माझ्यासारखा सामान्य कार्यकर्ता देखील पक्षाध्यक्ष पदी झेप घेऊ शकतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील पक्षाचे सामान्य कार्यकर्ते होते. मोदींनी दाखवलेल्या प्रतिभेमुळे ते आज पंतप्रधान पदावर आहेत.'

प्रियंका यांच्याबाबत बोलताना शाह म्हणाले की, 'राहुल यांचा अद्याप विवाह झाला नसल्याने काँग्रेसकडून प्रियंका यांना राजकारणात उतरवण्यात आले आहे.'

Dailyhunt
Top