Dailyhunt
Samay Raina : ".तरी तुमच्या मुलाला पायावर का उभं केलं नाही?" समय रैनाची अमिताभ बच्चन यांच्यावर टीका

Samay Raina : ".तरी तुमच्या मुलाला पायावर का उभं केलं नाही?" समय रैनाची अमिताभ बच्चन यांच्यावर टीका

Amitabh Bachchan and Samay Raina : कॉमेडियन समय रैना (samay raina) याने अनेक दिवसांनंतर एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामुळे तो पुन्हा चर्चेत आला आहे. 'इंडियाज गॉट लेटेंट' या शोच्या एका एपिसोडमध्ये पालकांवरून केलेल्या एका टिप्पणीमुळे कॉमेडियन समय रैना वादाच्या भोवऱ्यात सापडला होता.

त्यानंतर आता त्याने थेट बॉलीवूडचे महानायक अभिनेता अमिताभ बच्चन यांच्या पोलिओ जाहिरातींचा संदर्भ देत अभिषेक बच्चनच्या करिअरवर खोचक टीका केली आहे. Samay Raina

समय रैना व्हिडीओमध्ये म्हणाला, “मी खऱ्या आयुष्यात जसा आहे त्याहीपेक्षा अधिक वाईट इंटरनेटवर आहे. त्यामुळे मी काही चांगलं काम केलं तर लोक प्रश्न विचारणार नाही पण, जर एक चांगली प्रतिमा असलेल्या व्यक्तीने चुकून काही चुकीचं केलं तर लोक त्याच्यावर टीका करतील,” असं म्हटलं आहे.

याचंच उदाहरण देत तो म्हणाला, “मी केबीसीमध्ये गेलो होतो. तेव्हा सभ्य वागण्याचा प्रयत्न केला. तेव्हा माझ्या डोक्यात अनेक विचार आले. तेव्हा अमिताभ बच्चन यांना, सर तुम्ही इतक्या पोलिओच्या जाहिराती केल्या आहेत. तरी सुद्धा तुमच्या मुलाला त्याच्या पायावर का उभं करू शकला नाही? असा विचार आला, पण मी नाही बोलून दाखवलं. Amitabh Bachchan and Samay Raina

तिथे मी काय बोललो की सर माझी आजी तुमची खूप मोठी चाहती आहे. खरं तर माझ्या आजीचं निधन होऊन ७ वर्षे झाली आहेत. पण, तुम्हाला असा आव आणावा लागतो. भारतात इंटरनेटवर तुम्ही खरं वागू शकत नाही. हाच खरा खेळ आहे आणि मला तो कळतो,” असे समय रैना स्पष्ट केले. Amitabh Bachchan and Samay Raina

Tukaram Mundhe: "नवीन युगातील तुकारामांबाबत माहिती नाही"; तुकाराम मुंढेंबाबत सवाल करताच आमदाराचे अजब विधान

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat