Sambhajiraje Chhatrapati : बारामती पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारण पुन्हा एकदा तापले असून विविध पक्षांच्या भूमिकांबाबत तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. या ठिकाणी कॉँग्रेस पक्षाने थेट सुनेत्रा पवारांविरोधात उमेदवार दिला आहे.
महायुती सरकारकडून ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न सुरू होते. मात्र महायुतीला यश मिळाले नाही. परंतु येथून लक्ष्मण हाके यांनी माघार घेतली. सध्या येथे कॉँग्रेसचे आकाश मोरे आणि सुनेत्रा पवार यांच्या थेट लढत होणार आहे.
दरम्यान, सुनेत्रा पवार यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन आमदार रोहित पवार यांनी बारामतीकरांना केले. त्यानंतर आता संभाजीराजे छत्रपती यांनीही सोशल मिडियावर पोस्ट शेअर केली आहे. ज्यात त्यांनी सर्व पक्षांनी व नेतेमंडळींनी एक भावनिक आवाहन केले आहे. Sambhajiraje Chhatrapati
सुनेत्रावहिनी यांना विधानसभेत पाठवण्यासाठी सर्व पक्षांनी व नेतेमंडळींनी…
संभाजीराजे छत्रपती यांनी पोस्ट करत लिहिले की, “कै. अजितदादा पवार यांनी महाराष्ट्रासाठी दिलेले योगदान पाहता त्यांच्या पश्चात होत असलेली बारामती विधानसभा पोटनिवडणुक बिनविरोध करून सुनेत्रावहिनी यांना विधानसभेत पाठवण्यासाठी सर्व पक्षांनी व नेतेमंडळींनी सहकार्य करणे हे सर्वसामान्य जनतेला अपेक्षित आहे. Sambhajiraje Chhatrapati
निवडणुका दर पाच वर्षांनी येतच राहतील, मात्र भावनिक किनार असलेली ही पोटनिवडणूक बिनविरोध करून स्वर्गीय दादांच्या उत्तुंग कार्याची सर्वांनीच जाण राखावी,” असे आवाहन त्यांनी केले आहे. Sambhajiraje Chhatrapati
Tabu Akshay Friendship : बॉलिवूडची जुनी मैत्री चर्चेत! अक्षय कुमार-तब्बू यांनी आठवणींना दिला उजाळा

